एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ?

कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ?

ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये...

"आधी थोड्याच समजून घेऊ नेमके काय असते ग्रहण"

खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ?
सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असे संबोधले जाते.


चंद्राचा फक्त काही पृष्ठभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते.

ही सावली किती मोठी आहे, तितका तिचा प्रभाव दिसून येतो. या वेळी चंद्राच्या इतर भागावर गडद लालसर किंव्हा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात.

देशातील पूर्वोत्तर राज्यात पूर्ण चंद्रग्रहण तर काही ठिकाणी खंडग्रास चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) बघायला मिळणार आहे. देशात सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा सूतककाळ ८ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांला सुरू होणार आहे. चंद्रग्रहणाचा काळ हा ९ तासांचा असणार आहे. भारतातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये कंकणाकृती चंद्रग्रहण दिसणार आहे. भारताशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पेसिफिकमध्ये देखील चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेता येईल.



भारतात प्रमुख शहरात केव्हा दिसेल चंद्रग्रहण?

दिल्ली- सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटं.

नोएडा - सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटं.

अमृतसर- सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटं.

लखनौ- सायंकाळी ५ वाजून १६ मिनिटं.

भोपाळ- ५ वाजून ३६ मिनिटं.

लुधियाना- ५ वाजून ३४ मिनिटं.

जयपूर- सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटं.

शिमला- सायंकाळी ५ वाजून २० मिनिटं.

मुंबई- सायंकाळी ६ वाजून ०१ मिनिटं.

कोलकाता- सायंकाळी ४ वाजून ५२ मिनिटं.

रायपूर- सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटं.

पाटणा- सायंकाळी ५ वाजता.

इंदूर- सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटं.

देहरादून- सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटं.

उदयपूर- सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटं

गांधीनगर- सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटं.


चंद्रग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये?

चंद्र- सूर्य ग्रहण या नियमित घडणाऱ्या खगोलीय घटना आहेत. केवळ हा सावल्यांचा खेळ असून याचा मानवी जीवनावर आणि शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही. उलट या खगोलीय घटना विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांनी पाहाव्यात. त्याचा अभ्यास करावा आणि विश्वाचे नियम समजून घ्यावे.

#गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाहू नये, ग्रहणात बाहेर निघू नये, जेवू, खावू नये, ग्रहण वाईट असते. अशा अंधश्रद्धावर विश्वास न ठेवता ग्रहण पहावे.

#चंद्रग्रहण काळात तुळशीसह कोणत्याही वृक्ष-रोपट्याला स्पर्श करू नये?

काय होणार आहे? तुळशीसह कोणत्याही रोपट्याला हात लावला तर रोपटे कोमजनार ? मरून जाणार ? की जाळ होणार? की आपल्या हाताला काय होणार?

अश्या प्रकारच्या अनेक कारणे सांगितले जातात. हि कारणे परंपरेनुसार पुढच्या पिढीला ही चालू राहतात. पण ही एक अभ्यासाची बाजू आहे, या बद्दल जनजागृती करून सर्व भारतीय लोकांना सांगितले पाहिजे. चीन, अमेरिका, रशिया अश्या मोठ्या देशातही चंद्रग्रहण - सूर्यग्रहण होत असतात... ते लोकं पण असेच करतात का? हे असे भीती घालण्याचे प्रकार फक्त भारतात चालतो.

कधी कोणत्या न्यूज चॅनलवर बातमी आली का ? की अमुक अमुक ग्रहणात जेवला आणि त्याने खाल्लेले अन्न पाचले नाही, गरोदर  स्त्रियांनी ग्रहण पाहिले अन् मुलं उलटे डोकं वर पाय जन्माला आले?

याचा मानवी जीवनावर आणि शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही.

अश्या अंधश्रद्धावर विश्वास ठेऊ नका.

अश्या अंधश्रद्धावर विश्वास ठेऊ नका.

अश्या अंधश्रद्धावर विश्वास ठेऊ नका.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट