पोस्ट्स

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

कम्फर्ट झोन एक गोड सापळा: प्रगती थांबवणाऱ्या सवयीपासून दूर कसे राहावे?

इमेज
कम्फर्ट झोन एक गोड सापळा: प्रगती थांबवणाऱ्या सवयीपासून दूर कसे राहावे? प्रस्तावना : आपल्यापैकी प्रत्येकाला सुरक्षित आणि आरामदायी जीवन हवे असते. मात्र, जेव्हा हाच आराम आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीच्या आड येऊ लागतो, तेव्हा समजावे की आपण 'कम्फर्ट झोन' नावाच्या एका गोड सापळ्यात अडकलो आहोत. जिथे नवीन काही शिकायला मिळत नाही आणि कामात प्रगती होत नाही, तिथे थांबणे आपल्या भविष्यासाठी धोक्याचे ठरू शकते. रमेश आणि सुरेशची गोष्ट: रमेश आणि सुरेश हे दोघेही एकाच कंपनीत एकाच पदावर कामाला होते. रमेश येथे चार वर्ष आधीपासून होता. सुरुवातीची दोन वर्षे दोघेही सारखेच काम करत होते. मात्र, तिसऱ्या वर्षी कंपनीत नवीन तंत्रज्ञान आले आणि मॅनेजरने नवीन प्रोजेक्टची जबाबदारी घेण्यास सांगितले. रमेशला वाटले, "आपला पगार तर वेळेवर होतोय, कशाला उगाच नवीन टेन्शन घ्यायचे?" तो आपल्या जुन्याच आणि सोप्या कामात रमून राहिला. दुसरीकडे, सुरेशने भीती बाजूला ठेवून नवीन आव्हान स्वीकारले. सुरुवातीला सुरेशला खूप त्रास झाला, चुका झाल्या, पण त्याने हार मानली नाही आणि नवीन कौशल्ये शिकून घेतली. पाच वर्षांनंतर बॉ...

शाळा / कॉलेज निवडताना पालकांनी घ्यावयाची काळजी (Precautions for Parents When Choosing Schools and Colleges)

इमेज
मुलाच्या भवितव्यासाठी योग्य शाळा निवडणे हा प्रत्येक पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो . मुलाची आवड, घरापासूनचे अंतर, शाळेचा अभ्यासक्रम (Board) आणि तुमचे बजेट यांचा समतोल साधणारी शाळा निवडावी. शाळा निवडताना मुख्यत्वे शैक्षणिक गुणवत्ता, सुरक्षितता आणि मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शाळा निवडताना खालील महत्त्वाच्या गोष्टी पाहणे आणि माहिती घेणे आवश्यक आहे: १. शैक्षणिक मंडळ (Board) आणि अभ्यासक्रम योग्य बोर्डाची निवड:  तुम्हाला तुमच्या पाल्याला भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यानुसार SSC (स्टेट बोर्ड), CBSE, ICSE किंवा IB बोर्डाची निवड करा. स्टेट बोर्ड मराठी माध्यमही भरपूर प्रमाणात उपलब्घ आहेत. शिकवण्याची पद्धत: शाळा केवळ घोकंपट्टीवर (रट्टा मारण्यावर) भर देते की संकल्पना समजून सांगण्यावर (Concept-based Learning), याची माहिती घ्या. वर्ग शिकवणी व्यतिरिक्त अजून काही नवीन स्किल्स वर भर दिला जातो का ते पहा. (उदारणार्थ : रोबोटिक, Abacus' (अबॅकस), वैदिक गणित (Vedic Maths), कुमोन पद्धत (Kumon Method), मॉन्टेसरी ...

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

इमेज
  इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 करिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न: प्रश्न १) इयत्ता ११ वी (FYJC) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११वी साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी व प्रवेश मिळवण्यासाठी दिलेली ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठीची वेबपोर्टल सुविधा आहे. इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीय ऑनलाईन प्रणाली आहे. प्रश्न २) ११वी प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो? जे विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेले आहेत व राज्यमंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात ते यासाठी अर्ज करू शकतात. मान्यताप्राप्त, राज्यमंडळ:- SSC (Maharashtra State Board) CBSE (Central Board of Secondary Education) CISCE (Council for the Indian School Certificate Examinations) NIOS (National Institute of Open Schooling) प्रश्न 1) ११वी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का? होय, ऑफलाईन...

Corporate Management System

इमेज
  गण्याची गोष्ट - Corporate Work Status च्या नादात : काल संध्याकाळी गण्या एस टी स्टँड च्या दिशेने जोरात धावत दिसला. त्याला गाडी आडवी घालून विचारलं.... काय रे गण्या पळतोय कुठे ? गण्या धापा टाकत म्हणाला, अरे काय सांगू मित्रा, मला लवकर एस टी स्टँड वर सोडव.... मी विचारलं, अरे नक्की झाले तरी काय, ते सांग आधी... सोडतो तुला. गण्या म्हणाला, अरे बायको.... बायको.... माहेरी जात आहे. मी हसत विचारलं, तू भांडण केलेस वाटतं. गण्या म्हणाला, नाही रे मी सकाळी - सकाळी फक्त बायको ला विचारलं की तू आज घरी काय - काय काम करणार आहे याचा फॉलोअप दे. बायको म्हणाली, बिन पगारी फुल अधिकारी.... डोक्यावर काय परिमाण झाला आहे का? तुम्ही कंपनीत नाही स्वतःच्या घरी आहे घरी, आणि मी तुमची बायको आहे. त्या वर गण्या म्हणाला, अगं.... तसे नाही, पण head चे Control दाखवण्यासाठी मला तसे करावे लागते. गाण्याची बायको म्हणाली, Planning पेक्षा Monitoring जास्त चांगलं मॅनेजमेंट “काम झालं का?” आणि “काही अडचण आहे का?” विचारतं. तुम्ही या उलट का विचारता ? गण्या म्हणाला, जर वरच्या लोकांना staff वर पूर्ण विश्वास नसतो, तर ते रोज foll...

RTE 2026-27 पालकांसाठी सूचना (प्रवेश सुरू)

इमेज
  पालकांकरीता सूचना (2026-2027) 1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. 2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये. 3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही ! 4) सन २०२६-२७ साठी फक्त १ किमी अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. 5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. 6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. 7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद हो...

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व महाराष्ट्र राज्याची नियमावली, २०११ (Right To Education) RTE

इमेज
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व महाराष्ट्र राज्याची नियमावली, २०११ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ संसदेने संमत केला. या अधिनियमाची अंमलबजावणी १ एप्रिल, २०१० पासून संपूर्ण देशात सुरू झाली आहे. या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम, २०११ ही नियमावली अधिसूचीत केली आहे. या कायद्यात 'मोफत' हा शब्दप्रयोग बालकांसाठी लागू आहे. बालकाच्या वयाची १४ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेत पाठविणे, शिक्षणाची व शिक्षकांची उपलब्धता करून देण्याची सक्ती शिक्षक, पालक, शाळा, समाज, शासन, स्थानिक प्राधिकरण इत्यादी सर्वांवर आहे. या अधिनियमातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत:- (१) बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार : ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण या विधेयकाद्वारे देण्यात आले आहे. त्यास प्राथमिक शिक्षण घेण्यास प्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

Corporate Management System

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

कधी कधी असं का होतं

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट