पोस्ट्स

विशेष लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

इमेज
  "एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट" एक वर्षापूर्वी तोच रोड आणि तीच चहाची टपरी भाग १ : त्या वेळेस झालेले आमचे संभाषण : रस्त्याने जाताना एक मित्र भेटला. म्हणाला खूप दिवसांनी भेटलास, मीही तेच म्हणालो....😉 चल बसू म्हटल्यावर, आम्ही टपरीवर चहा घेता-घेता सहज विचारले... मित्रा काय करतो? झालं का D.Ed - B.Ed.....? तो म्हणाला, कसलं काय... अर्धवट राहिलं, पण सध्या दहावी आणि बारावी Classes चालू करायचा विचार करत आहे. थोडा staff ठेवून मोक्याच्या जागी भाड्याने करेल चालू. मी म्हणालो, कल्पना चांगली आहे. तुझ्या डोक्यात तर आधीपासूनच हे स्वप्न होते... ते तू १०० टक्के करून दाखवणारच.... पण एक मात्र लक्षात ठेव... Staff ठेवताना आपल्याजवळचे नातलग ठेवू नकोस.... तो म्हणाला, का रे...? अरे...., उलट मी नातलगच स्टाफ पाहिले आहेत, कारण ते प्रामाणिक काम करतील, माझ्या class ची प्रगती करतील, शिवाय कामाचे पैसे ही कमवतील. आपल्याच माणसांचे घर भरेल, त्यांना रोजगार मिळेल आणि थोडे विश्वासू परके ही ठेवेल. मी म्हणालो, तुझं सर्व मान्य आहे. पण नको रे.... एखादा परका माणूस परवडला पण नातेगोते धोक्यात आणतात. जर क...

ऑफिस पॉलिटिक्समध्ये कसे जिंकाल Clarity | Character | Calmness | Competence चतुःसूत्री वापर कसा कराल :

इमेज
ऑफिस पॉलिटिक्समध्ये कसे जिंकाल Clarity | Character | Calmness | Competence चतुःसूत्री वापर कसा कराल :- तुमचं character, clarity, calmness आणि काम हे तुमचं शस्त्र आहे. चला तर मग पाहू या वर उपाय :-  1. ऑफिस पॉलिटिक्स समजून घ्या - नाक मुरडू नका :- याला टाळता येत नाही. प्रत्येक ठिकाणी हे असतंच - कारण माणसं जिथं असतात तिथं "Interests Clash" होतात. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही, तर प्रभाव आणि संबंधांची खेळी आहे. - कोणाचा बॉसवर जास्त प्रभाव आहे? - कोण कुणाला पाठीशी घालतो? - कोण कुठल्या निर्णयामागे आहे? -"Who Influences Whom" हे ओळखा. 2. इमोशनल इंटेलिजन्स वापरा:– भावनांवर कंट्रोल ठेवा कोणीतरी तुमचं नाव घेऊन गॉसिप करतंय? लगेच रिऍक्ट होऊ नका. तुमच्यावर जळतात? शांत राहा, सतत पुरावे ठेवत रहा. कोणीतरी तुमचं काम स्वतःचं म्हणतंय? Documented रहा. राजकारणात भडकणारा हरतो - संयमी व्यक्ती चतुर ठरतो. 3. "Allies" बनवा :- एकटं राहू नका ज्या लोकांवर विश्वास ठेवता येईल असे काही सहकारी ठेवा. सगळ्यांशी चांगलं वागा - Not Fake, But Fair. टीममधले छोटे छोटे Favor लक्षात ठेवा - पण त्...

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

इमेज
  कान भरणे मनुष्यस्वभाव हा सहजरीत्या प्रभावित होणारा आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याचा, त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांचा आपल्या विचारसरणीवर आणि निर्णय क्षमतेवर मोठा प्रभाव पडतो. मात्र, प्रत्येकजण आपल्या भल्यासाठीच बोलतो असे नाही. काही वेळा काही लोक हेतूपूर्वक किंवा नकळत आपल्या मनात शंका असतात. द्विधा, आणि नकारात्मकता निर्माण करतात. अशा परिस्थितीत कोणीतरी आपले कान भरवत आहे, हे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून "कान भरणे" म्हणजे काय, त्याची लक्षणे, त्यामागील मानसिक प्रक्रिया, आणि त्यापासून स्वतःला कसे वाचवावे याविषयी सखोल माहिती घेऊ. तसेच काही वास्तववादी उदाहरणे आणि उपाय सुद्धा पाहू. "कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्रात "कान भरणे" म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विचारसरणीवर प्रभाव टाकून त्याला आपल्या इच्छेनुसार विचार किंवा वर्तन करण्यास प्रवृत्त करणे. ही प्रक्रिया बऱ्याचदा नातेसंबंध, मैत्री, किंवा व्यावसायिक जगतात दिसून येते. कोणी आपले कान भरतोय का, हे ओळखण्यासाठी आपल्याला काही ठराविक गोष्टींकडे लक्ष द्यावे...

In Work place "Where do you see yourself in Five Years"

इमेज
  आला का असा अनुभव कधी?   👇🏻 "They Physically Pushed Me Out" क सं असतं माहित आहे का? असं माणसे त्या ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही. एखाद्या कामाच्या ठिकाणी नवीन माणूस:- समजायला उशिर झाला पण अनुभव मोठा मिळाला, आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं.... लोकं थोडी LATE कळाली पण PERFECT कळाली. माणूस कामात कितीही Active/हुशार/प्रामाणिक असूद्या, तो यातून जातोच, म्हणजे या माणसांना Hard Work पेक्षा Smart Work करायला जास्त आवडत असेल तर आधीच्या काही माणसांना याचे smart work बिलकुल आवडत नसतं. एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ|| कोण जाणे कैसे परी। पुढे उरी ठेविता|| अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण|| एका म्हणे अवघी जोडी। ते आवडी चरणांची|| (तुकाराम महाराज) अनुभव बरेच काही सांगून जातो एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ|| हे ब्रीदवाक्य संस्था/कंपनीमध्ये प्रत्येकाच्या मनात असावं. न वीन आलेला व्यक्ती त्याच्या कामाचा performance जीवतोडून करत असतो, कारण त्याला यापूर्वीचे कित्तेक अनुभव असतात की जर या पद्धतीने काम केले तर नक्कीच संस्था/कंपनीचा फायदा होईल. आपण कोणत्या post साठी appoint...

खुर्ची

इमेज
  खुर्ची वरून माणसाची किंमत ठरवली जाते खुर्ची खुर्ची वरून माणसाची किंमत ठरवली जाते आणि खुर्चीवर बसणार स मोरच्याला किती किंमत देतो हे त्या वरून तो किती प्रामाणिक आहे हे समजले जाते. एक दा प्रामाणिक काम करत असेल अन् त्याच्या छोट्या छोट्या चुका काढत असतील तर त्या प्रामाणिक काम करणाऱ्यांची कोणतेही काम करण्याची इच्छा होईल का.....? काहींना हुशारी दाखवायची खुप सवयच असते, आपणच भारी... बाकी दुनिया वेडी... असे त्याला वाटत असते. क सयं, मिळालेल्या पदाचा वापर चांगला केला तरच समोरचा टिकतो, नाहीतर एक क्षणभर तिथे थांबायची इच्छा होत नाही... माणसाचा मशीन म्हणून उपयोग केला की मशीन एक ना एक दिवस बिघडतेच... म्हणून म्हणतो, माणुसकी जपा चला नाहीतर एक दिवस जवळून जातील पण कोण विचारणार नाही... सर्वच ऐकून घेणारे नसतात, हे लोकं वेळ आल्यावर त्याची जागा नक्की कुठे आहे हे दाखवल्या शिवाय राहत नाही.... ___मराठी लेख विशाल डोळस

माणसाच्या अंगातील कला - भाग १

इमेज
कला प्रतेक मानवाच्या अंगात एक ना एक कला असतेच... काहींच्या अंगात इतक्या कला असतात की, त्याच्या कलेला कुठे तोड नसते... अन् काहींच्या अंगात काहीच नसले की मनात मात्र भर - भरून कला असतात... मग मनात कला कशी असेल..? हे प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेतलाच असणार...! स मोरचा कितीही गुण संपन्न असू, त्यात जो चुका काढतोच, ही त्याची एकमेव व आयुष्यभर पुरणारी मनात कला असते. या माणसांना कधीच कोणाचे चांगले देखवत नाही. अशी माणसे दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात माहिर असतात, याला "नयनकला" असेही म्हणतात.  हे आनुवंशिक नसले तरी अशी माणसे लहानपणी समजायला लागल्यापासून तसेच असतात, कदाचित त्यांच्या सकस बुद्धीने त्यांना तशी देणगी दिली असणार. हे लोकं सुरवातीला आपल्या कुटुंबातही चुका काढत असतात, त्यात विजय झाले की बाहेरील लोकांच्या चुका शोधण्यात हुशार होतात... जसा - जसा अनुभव वाढतो तसा - तसा अजून वाव मिळतो... उदरणार्थ: एकदा अनोळखी माणूस रस्त्याने चालत असेल तरी, तो कसा चालतो, चप्पल कोणती घालतो, कपडे कसे आहेत, चालताना हात पुढे - मागे होतात की स्तब्ध हात घेऊन चालतो, इतके बारीक लक्ष ठेऊन असतात.  आता य...

Eye Flu Conjunctivitis प्रमाण वाढले, डोळ्यांचे आजार, पावसाळ्यातले आजार ( Over 2370 cases of viral conjunctivitis reported in Pune's temple town of Alandi )

इमेज
नमस्कार, मी विशाल डोळस, आपल्यासारखा सामान्य नागरिक. आळंदी नगरपरिषेद राहतो म्हणून हा खास लेख तुमच्यासाठी सदर करीत आहे. (Over 2370 cases of viral conjunctivitis reported in Pune's temple town of Alandi) पावसाळा म्हटलं की साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण एकदम वाढीस लागते आणि त्यातही पावसाळ्यात डोळ्यांचे आजार प्रचंड प्रमाणत वाढतात. मागच्या काही दिवसात डोळ्यांच्या या आजाराचे एकूण रुग्ण सुमारे २३७० च्या आसपास दिसून आलेले आहेत आणि जास्त करून यात लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. तर या पार्शभूमीवर आज मी आपणास Marathi Corner वारसा मराठी भाषेचा या  मराठी लेखच्या माध्यमातून डोळ्यांच्या आजाराची कारणे, परिणाम, लक्षणे, उपाय, काळजी कशी घेणे आणि इतर माहितीच्या आधारे या सर्वांवर नजर टाकणार आहोत... दिल्ली मध्ये Eye Flu Conjunctivitis प्रमाण वाढले असून त्या सोबत आळंदी (देवाची आळंदी) तालुका खेड जिल्हा पुणे (महाराष्ट्र) ठिकाणी वाढत आहे. खेड तालुका आरोग्य अधिकारी, आळंदी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून आरोग्य पथका रवाना करत मुलांची आरोग्य तपासणी, आरोग्य सल्ला सेवा व उपचार, मार...

आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे

इमेज
  आज Social Media वरती आपण जेव्हा Page Scroll करतो, दोन Video नंतरचा प्रत्येक Video आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो, की बाबा केस कसे विंचरायचे, कपडे कसे घालायचे, Hotel मध्ये बसायचे कसं, जेवायचे कसं, उठायचं कसं..... आपल्या आई बाबा सोबत कसे बोलायचे, आपण ज्यांना जन्म दिलाय त्या मुलांबद्दल आपण कसे बोलायचं, कसं वागायचं.... तो त्यांचा  अनुभव झाला नाही का ... पण तो फक्त  त्यांचाच अनुभव झाला... आपला वेगळा असू शकतो एकाच प्रसंगतला दोन व्यक्तींचा अनुभव वेगळा असू शकतो की... जसं पाऊस पडायला लागला की एखाद्याला कविता करावीशी वाटते, एखाद्याला चिंता करावीशी वाटते, की बाबा छप्पर गळतय, करायचं काय त्याचं आपण... मला असं वाटते की   "दुसऱ्याच्या अनुभवाची शिदोरी ही आपल्या आयुष्याच्या प्रवासात कधी पर्यंत पुरणार ?... नाही का" हो, म्हणजे कधी पर्यंत पुरणार नाही का, आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे, पण आयुष्यात जगण्यासारखे खूप काही आहे, नाही का.....

मराठी कविता - आठवणीतल्या बालपणात

इमेज
  आठवणीतल्या बालपणात आठवणीतल्या बालपणात सैर मारावी एकदा मनसोकत.... आठवणीतल्या बालपणात लहान व्हावे एकदा मनसोक्त.... आठवणीतल्या बालपणात ताणमुक्त व्हावे एकदा मनसोक्त.... आठवणीतल्या बालपणात मोठे होवूच नये आयुष्य तिथेच जगावे एकदा मनसोक्त.... आठवणीच्या बालपणात एकदा देवाने संधी दिलीच जगायची तर,  मारावी आठवणीच्या बालपणात सैर एकदा मनसोक्त.... एकदा मनसोक्त....  एकदा मनसोक्त....  एकदा मनसोक्त....

Work Place Bad Habits - कामाच्या ठिकाणी वाईट सवयी

इमेज
  Work Place Bad Habits - कामाच्या ठिकाणी वाईट सवयी कामाच्या ठिकाणी या वाईट सवयी घातक ठरू शकतात. यामुळे ना तुमचं इंक्रिमेंट होईल ना प्रमोशन..... तुम्हाला तुमच्या वर्कप्लेसवर प्रमोशन किंवा इंक्रिमेंट मिळवायची असेल तर तुमची वागणूक व तुमच्या वाईट सवयी बदलाव्या लागतील. त्या वाईट सवयी कोणत्या त्या जाणून घेऊया. वाईट सवयी (Bad Habits) : कुठल्याही कामाच्या ठिकाणी तुमच्या स्किल्ससोबत तुमची वागणूक महत्त्वाची ठरते. तेव्हा तुमची वागणूक कशी आहे त्यावर तुमचं प्रमोशन आणि इंक्रिमेंट ठरू शकते. मात्र तुमच्या सर्व सवयी तुमच्या कामात आणि त्याचबरोबर तुमच्या करिअर सक्सेस मध्येही अडथळे आणू शकतात. अनेकदा असे होते की, तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीवदेखील नसते. कामाची सुरुवात न करणे : करिअर एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की, जे कर्मचारी स्वतःवरून कामाची सुरुवात करत नाहीत, त्यांची नवं काही शिकण्याची इच्छा / उत्सुकता नसते, ते सारखे घड्याळात बघत असतात. एखादं काम १ तासाचे असेल तरी त्या कामाला दोन तास लावायचे. हे बॉसला अजिबात आवडत नाही. तेव्हा तुमची ही सवय प्रमोशनच्या वेळी तुमची फजिती करू शकते. जे लोक स्वतःच्या आयडि...

पॉडकास्ट माहिती : म्हणजे काय, प्रकार, फायदे, पैसे कसे कमवावे?

इमेज
पॉडकास्ट माहिती : म्हणजे काय, प्रकार, फायदे, पैसे कसे कमवावे? (What Is Podcast Information In Marathi) पॉडकास्ट हा शब्द भारतात नुकताच लोकप्रिय होऊ लागला आहे. आजकाल कुठेतरी तुम्ही सर्वांनी पॉडकास्टचे नाव नक्कीच ऐकले असेल. परंतु आपल्या सर्वांनाच त्याबद्दल योग्यरित्या माहिती नसेल. याचा अर्थ असा नाही की या पॉडकास्ट प्रकारात वाव नाही. हा आपल्या सर्वांचा गैरसमज देखील असू शकतो. कारण परदेशातील लोक यूट्यूब आणि ऑनलाईन ब्लॉग वगळता पॉडकास्ट ऐकणे पसंत करतात. तुम्ही सर्वांनी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबमध्ये बरेच व्हिडिओ पाहिले असतील आणि कदाचित तुम्ही ते व्हिडिओ बनवले सुद्धा असतील. पण तुम्ही कधी ऑडिओ तयार किंवा रेकॉर्ड केला आहे का? आणि तुम्ही ते कुठेतरी अपलोड केले आहे का? जेव्हा तुम्ही सोशल मीडिया वर आलात, तुम्हाला जर तुमच्या कल्पना शेअर करायच्या आहेत, तर तुम्ही यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरता आणि तुमच्या कल्पना लोकांशी शेअर करता, तर तसेच हा पॉडकास्ट हा देखील सोशल मीडियाचा एक भाग आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती शेअर करू शकता. लोगोसह शेअर करू शकता. ते कसे करायचे? पॉडकास्ट चा अर्थ काय आहे, ...

कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ?

इमेज
कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ? ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये... "आधी थोड्याच समजून घेऊ नेमके काय असते ग्रहण" खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ? सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असे संबोधले जाते. चंद्राचा फक्त काही पृष्ठभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. ही सावली किती मोठी आहे, तितका तिचा प्रभाव दिसून येतो. या वेळी चंद्राच्या इतर भागावर गडद लालसर किंव्हा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात. देशातील पूर्वोत्तर राज्यात पूर्ण चंद्रग्रहण तर काही ठिकाणी खंडग्रास चंद्रग्रहण ( Chandra Grahan 2022)   बघायला मिळणार आहे. देशात सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा सूतककाळ ८ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांला सुरू होणार आहे. चंद्रग्रहणाचा काळ हा ९ तासांचा असणार आहे. भारतातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये कंकणाकृती चंद्रग्रहण दिसणार आहे. भारताशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पेसिफिकमध्ये देखील चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेता येईल. भारतात प्रमुख शहर...

सूर्यग्रहण - भारत

इमेज
 दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज २५ ऑक्टोबरला देशात आणि जगात सूर्यग्रहण होणार आहे. २०२२ सालातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2022 ) आहे. हे ग्रहण भारतातील काही शहरांमधून पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कारण, असे ग्रहण पुढील दशकभर भारतातून दिसणार नाही. देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे. ग्रहणकाळात भारतातील लोकांना फक्त ४३ टक्के मंद सूर्यच दिसणार आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सूर्य हा आपल्या कक्षेत फिरत असतो. मात्र, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. या खगोलीय स्थतीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या काही किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.अशा प्रकारचे सूर्यग्रहण भारतात २ ऑगस्ट २०२७ रोजी दिसणार आहे.भारतातील वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:२९ वाजता सुरू होणार आहे. हे...

प्रेरणादायी लीडर कसे बनाल

इमेज
जेनिफर नावाचा एक तरुण संस्थेत कामाला लागला. खरं तर सुरवातीलाच काही लोकांना जेनिफर हे नाव थोड विचित्र वाटलं, वेगळं नाव वाटलं. पण याच वेगळ्या नावाच्या तरुणाने चमत्कार घडवला. तो म्हणजे असा की, जेनिफर सुरवातीला ज्या डिपार्टमेंटमध्ये कामाला गेला तिथे काही दिवसातच सर्वांना अस दिसलं की, या डिपार्टमेंटची क्षमता वाढली आहे. तिथली पेंडिंग कामं भराभरा संपत चालली होती. फक्त त्याच डिपार्टमेंटची नाही तर इतर असणाऱ्या विभागाचंही तसच व्हायला लागलं. त्या नंतर दर तीन महिन्यानंतर जेनिफरची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. ज्या ज्या विभागात जेनिफरची बदली करण्यात आली त्या त्या विभागात आश्चर्य दिसायला लागलं. तो विभाग क्षमते पेक्षा जास्त चागलं काम करायला लागला. त्या कंपनीच्या मुख्य प्रबंधकाला याच आश्चर्य वाटलं की, असं कसं घडलं....? ज्या वेळेस त्यानी विचारणा केली असता, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की, जेनिफर ज्या ठिकाणी जातो तिथे त्याच्या सहकाऱ्यांना प्रचंड मोठे प्रेरणास्रोत बनतो. ज्या मॉल मध्ये त्याला काम मिळालं होते त्या मॉल मधून त्याला शहरातल्या त्याच कंपनीच्या दुसऱ्या मॉल मध्ये पाठवले गेले. तिथेही त्याच घटना...

मा. द्रौपदी मुर्मू - देशाची एक आदिवासी कन्या राष्ट्रपती

इमेज
  भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून मा. द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्या... आदिवासी कुटुंबाचे अध्यक्षपदाचे उमेदवार एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशामध्ये आदिवासी कुटुंबात झाला. त्यांना रमा देवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर मा. द्रौपदी यांनी ओडिशाच्या राज्य सचिवालयातून नोकरीला सुरुवात केली. त्यांचं लग्न श्याम चरण मुर्मूशी झाले आहे. १९९७ मध्ये प्रथमच नगर पंचायतीची निवडणूक जिंकून त्या प्रथमच स्थानिक नगरसेवक झाल्या. तीन वर्षांनंतर त्या रायरंगपूरच्या त्याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या. ओडिशातील अत्यंत मागासलेल्या आणि संथाल समुदायातील ६४ वर्षीय द्रौपदी यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. आर्थिक अडचणींमुळे केवळ पदवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या द्रौपदी यांनी शिक्षणालाच आपले करिअर बनवले. याआधी त्यांनी ओडिशा सरकारमध्ये काम केले आहे. नंतर राजकारणासाठी भाजपची न...

शाळेच्या गमती-जमती भाग १

इमेज
माझी  आवडती शाळा..... (Nirgude, Tal. Junnar, Dist. Pune) १९९४ ते १९९६-९७ छान वाटतं बोलवायला ना कि फक्त शाळा जरी म्हणते तरी आपले मन लगेच आपल्या बालपणात जातं. आपली शाळा आठवते. आपले जवळचे मित्र, जीव लावणारे शिक्षक आणि सर्वात महत्वाचे मार देणारे शिक्षकही आठवतात. "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" खरच ते खुप गोड दिवस असायचे. हे आत्ता समजायला लागलं, पुन्हा ते दिवस येणे नाही. शाळेत असताना मस्ती मौज-मजा खुप असायची. तेवढेच मस्करी-भांडणही असायचं. आपले शिक्षक आपल्याला सतत मारतात हे त्या वेळेस खुप वाईट वाटायचे, पण आत्ता समजले तो मार आपल्यासाठीच खुप महत्वाचा असायचा. शिक्षक विनाकारण कधीच मारत नसायचे. अपूर्ण गृहपाठ, पाढे पाठ नाही, शाळेची दांडी, शाळेत उशीरा येणे वैगरे कारणे असायचे आणि असे एक-एक किस्से असायचे की आत्ता आठवले तरी गालातल्या-गालात हसायला येत. आपल्या शाळेचा वर्ग म्हणजे सर्वात पुढच्या बाकावर बसलेले आपले मित्र म्हणजे सर्वात हुशार गणले जायचे. मध्यम भागात बसलेले ना हुशार ना ढ, आणि मागच्या बाकावर बसलेले काही विचारायला नकोच, त्यांची गणना मस्तीखोर-भांडखोर, "ढ" अशीच असायची....

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट