पोस्ट्स

दिन विशेष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

पहिला राष्ट्रीय महिला दिन - सरोजिनी नायडू

इमेज
पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा  क रण्यात आला? जाणून घ्या इतिहास भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात दरवर्षी १३ फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. १२ व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. (  अजून कथा, गोष्टी वाचण्यासाठी  )सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देख...

प्रेरणादायी लीडर कसे बनाल

इमेज
जेनिफर नावाचा एक तरुण संस्थेत कामाला लागला. खरं तर सुरवातीलाच काही लोकांना जेनिफर हे नाव थोड विचित्र वाटलं, वेगळं नाव वाटलं. पण याच वेगळ्या नावाच्या तरुणाने चमत्कार घडवला. तो म्हणजे असा की, जेनिफर सुरवातीला ज्या डिपार्टमेंटमध्ये कामाला गेला तिथे काही दिवसातच सर्वांना अस दिसलं की, या डिपार्टमेंटची क्षमता वाढली आहे. तिथली पेंडिंग कामं भराभरा संपत चालली होती. फक्त त्याच डिपार्टमेंटची नाही तर इतर असणाऱ्या विभागाचंही तसच व्हायला लागलं. त्या नंतर दर तीन महिन्यानंतर जेनिफरची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. ज्या ज्या विभागात जेनिफरची बदली करण्यात आली त्या त्या विभागात आश्चर्य दिसायला लागलं. तो विभाग क्षमते पेक्षा जास्त चागलं काम करायला लागला. त्या कंपनीच्या मुख्य प्रबंधकाला याच आश्चर्य वाटलं की, असं कसं घडलं....? ज्या वेळेस त्यानी विचारणा केली असता, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की, जेनिफर ज्या ठिकाणी जातो तिथे त्याच्या सहकाऱ्यांना प्रचंड मोठे प्रेरणास्रोत बनतो. ज्या मॉल मध्ये त्याला काम मिळालं होते त्या मॉल मधून त्याला शहरातल्या त्याच कंपनीच्या दुसऱ्या मॉल मध्ये पाठवले गेले. तिथेही त्याच घटना...

मा. द्रौपदी मुर्मू - देशाची एक आदिवासी कन्या राष्ट्रपती

इमेज
  भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून मा. द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्या... आदिवासी कुटुंबाचे अध्यक्षपदाचे उमेदवार एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशामध्ये आदिवासी कुटुंबात झाला. त्यांना रमा देवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर मा. द्रौपदी यांनी ओडिशाच्या राज्य सचिवालयातून नोकरीला सुरुवात केली. त्यांचं लग्न श्याम चरण मुर्मूशी झाले आहे. १९९७ मध्ये प्रथमच नगर पंचायतीची निवडणूक जिंकून त्या प्रथमच स्थानिक नगरसेवक झाल्या. तीन वर्षांनंतर त्या रायरंगपूरच्या त्याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या. ओडिशातील अत्यंत मागासलेल्या आणि संथाल समुदायातील ६४ वर्षीय द्रौपदी यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. आर्थिक अडचणींमुळे केवळ पदवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या द्रौपदी यांनी शिक्षणालाच आपले करिअर बनवले. याआधी त्यांनी ओडिशा सरकारमध्ये काम केले आहे. नंतर राजकारणासाठी भाजपची न...

राघोजी भांगरे (सह्याद्रीचा वाघ) RAGHOJI BHANGRE

इमेज
सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे - अभिवादन दिवस २ मे  आद्यक्रांतिकारक / सुभेदार /  सह्याद्रीचा वाघ महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक पूर्ण नाव :- राघोजीराव रामजीराव भांगरे वडील व आईचे नाव :- रामजी व रमाबाई  गाव :- देवगाव ( तालुका  अकोला, अहमदनगर, महाराष्ट्र) जन्म :- ८ नोव्हेंबर १८०५ ( डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात) मृत्यू :- २ मे १८४८ (ठाणे सेंट्रल जेल - फाशी) आज ठाण्याजवळ शहापूरनजीक [ आज ठाण्यानजीक शहापूर तालुक्यातील एका गावाजवळ त्यांची भग्न अवस्थेत समाधी आहे ] राघोजींच्या जन्मावेळी गायला गेलेला पोडावा   “ रमायाबाई म्हणे राघू माझा गं लहान मावळ मुलुखाचा राजा होईल महान ! रमायाबाई म्हणे राघू माझा गं बल दंड जुलमी सावकाराविरोधी हा पुकारील बंड !!” महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोला) [ शोण   नदीच्या   किना - यावर   वसलेल्या   महाकाळ   डोंगर   रांगेतील   चोमदेव   डोंगराच्या   पश्चिमेकडील   या ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Corporate Management System