पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

नवऱ्याचा वेटर मित्र

इमेज
नवऱ्याचा वेटर मित्र बायको : अहो, चला ना दिड वर्ष झालं या लॉकडाऊन मुळे कुठे बाहेर जात आले नाही. ना कुठे मॉल, ना शॉपिंग, ना हॉटेल... पार वैताग आला घरीच बसून. काय चालू काय बंद करता करता पुन्हा सर्वच बंद झालं तर घर जेल सारखे वाटतं. अगं मग चिडतेस कशाला, जाऊ की संध्याकाळी. हो पण कुठे.... हो.....? एक काम करू, तुला संध्याकाळचा किचनला आराम म्हणून जवळच्या हॉटेल मध्ये जाऊ. वाह....! वाह....! अगदी माझ्या मनातले बोललात. छान... मग चालेल, खुप छान वाटेल. असे बोलून मी आपल्या ऑफीसच्या कामात घरच्या-घरी मग्न झालो. सकाळचा चहा - बिस्कीट झाल्यावर दुपारी पण तेच होतं. कारण संध्याकाळी आपण बाहेर जाणार मग घरी जेवण कशाला बनवायचं, हे बायकोच्या डोक्यात. संध्याकाळ झाली तेच बायकोची आवरा-आवर चालू झाली. एरव्ही ती दुपारी झोपत असते, पण आज ना झोप - ना घरचं जेवण बनवायचा त्रास, जाम खुश. मला म्हणाली अहो, आवरा लवकर उशीर होईल मग रात्री येता-येता. याचा अर्थ मी समजून गेलो की बायकोला हॉटेल मध्ये जायची घाई झाली आहे. मनातल्या मनात हसलो आणि मीही तयारी केली. घरच्या जवळच एक हॉटेल होते. तिथे गेल्यावर गेट समोरच लोकांची मोठी रांग होती. आत ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

Corporate Management System

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं