पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

आपट्याची पाने

इमेज
आपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात? दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोने घ्या चांदी द्या” म्हणत दसरा साजरा करत असतो. पण आपण आपट्याचीच पाने का वाटतो हे आपणास माहीत आहे का? चला तर मग आज जाणुन घेऊया विजयादशमी तथा दस-याला सोनं म्हणुन आपट्याची पाने का वाटतात. आपट्याची पाने तेजतत्व रुपी आहेत, त्याने वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. आपट्याची पाने तम-रजात्मक असल्याने त्याच्यातून प्रक्षेपित होणारे तेज कण वातावरणात शुद्धता निर्माण करतात. या आपट्याच्या पानात ईश्वरी तत्वाचा वलय निर्माण होतो. त्यामुळे ती पाने एकमेकांना दिल्यावर दोन्ही व्यक्तींच्यात आनंदाचे व स्नेहपुर्वक संबंध निर्माण होतात अशी उदात्त भावना हिंदू परंपरेत आढळून येते. त्यामुळे दस-याच्या दिवशी आपट्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आपण दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोन घ्या सोन्यासारख रहावा” असे म्हणतो. आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणज...

नवरात्रीतले नऊ रंग

इमेज
बायकांनो, नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता मार्केटिंग फंडा... नवरात्र आलं की, "सरडासुद्धा जितक्या झटपट रंग बदलणार नाही, तितक्या झटपट या बायका येत्या नऊ दिवसांत रंग बदलतील" हा बायकांच्या रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसण्यावर कमेंट करणारा जोक येतोच येतो. पण बायका आपल्या महाधीट. असल्या फालतू जोकला मुळीच भीक न घालता तेवढ्यात उत्साहाने ठेवणीतल्या साड्या नेसून ऑफीसला जायला निघतात. काहीजणी आणि काहीजणसुद्धा, हा रंग म्हणजे अगदी जीवापाड पाळतात. कधी त्या निमित्तानं नव्या खरेद्यासुद्धा होतात. काही लोकांची, "नाहीतरी एवीतेवी कपडे घालायचे असतातच ना, मग घालू आजचा रंग" अशी भावना असते. तात्पर्य काय, मनापासून किंवा गंमत म्हणून महाराष्ट्रात बरीचशी जनता हे रंगांचं फॅड एंजॉय करते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो. आम्हाला पडला हा प्रश्न. आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं. उत्तर आणि त्यामागची कथा मोठी ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25