एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

राघोजी भांगरे (सह्याद्रीचा वाघ) RAGHOJI BHANGRE

सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे - अभिवादन दिवस २ मे 

आद्यक्रांतिकारक / सुभेदार / सह्याद्रीचा वाघ

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक


पूर्ण नाव :- राघोजीराव रामजीराव भांगरे

वडील व आईचे नाव :- रामजी व रमाबाई 

गाव :- देवगाव (तालुका अकोला, अहमदनगर, महाराष्ट्र)

जन्म :- ८ नोव्हेंबर १८०५ (डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात)

मृत्यू :- २ मे १८४८ (ठाणे सेंट्रल जेल - फाशी) आज ठाण्याजवळ शहापूरनजीक

[आज ठाण्यानजीक शहापूर तालुक्यातील एका गावाजवळ त्यांची भग्न अवस्थेत समाधी आहे ]


राघोजींच्या जन्मावेळी गायला गेलेला पोडावा 

रमायाबाई म्हणे राघू माझा गं लहान

मावळ मुलुखाचा राजा होईल महान !

रमायाबाई म्हणे राघू माझा गं बल दंड

जुलमी सावकाराविरोधी हा पुकारील बंड !!”


महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोला)[शोण नदीच्या किना-यावर वसलेल्या महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात]  येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे महादेव कोळी साम्राज्य असलेल्या जव्हारच्या मुकणे संस्थानाच्या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामाजी यांनी राघोजींना घरीच शिक्षणाची व्यवस्था केली. पुढे राघोजी हे तलवारबाजी, पट्टा चालवणे, भालाफेक, बंदुकीने निशाणा साधणे आणि घोडेस्वारी यामध्ये तरबेज झाले. राघोजींना लहानपणापासून व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांचे शरीर मजबूत झाले होते. 

एकदा रानात फिरता फिरता त्यांना वाघ दिसला. आपल्या बंदुकीचा चाप ओढून राघोजीयांनी गोळी झाडली. परंतु यांच्या पायांच्या आवाजाने सावध झालेल्या वाघाने ती गोळी चुकवली. ती गोळी वाघाच्या मानेजवळून गेली. जखमी झालेला वाघ पिसाळला  त्याने परत हल्ला करत राघोजी यांच्यावर उडी मारली, अंगावर चालून आलेल्या वाघाला घाबरून जाता अतिशय सावधरीतीने वाघावर प्रतिहल्ला केला. दोघांमध्ये भपूर धरपकड सुरु झाली. काही क्षणात राघोजी यांने त्या वाघावर आपले वर्चस्व सिध्द करत त्याचा खालचा जबडा एका हाताने वरचा जबडा एका हाताने धरून फाडला. रक्ताच्या थारोळ्यात वाघ जागेवर पडला होता. राघोजींच्या या धाडसी पराक्रमाचे कौतुक सर्व परिसरातील लोक करू लागले होते.

त्याकाळात इंग्रज सरकार अकोले तालुक्यातील रतनगड आपल्या ताब्यात आला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू होते. याच रतनगडावर रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली गोविंदराव खाडे, लक्षा ठाकर, वालोजी भांगरे आणि रामा किरवा यांनी १८२१ साली जाहीर उठाव केला होता. कॅ. Mackintos या भागातील आदिवासी क्रांतिकारकांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी ५ हजार फौज गडावर चाल केली. त्यावेळी किल्यावर ५०० सैनिक होते. गडावर चढाई करताना रतनगडावरून होणार कडवा विरोध पाहून कॅ. Mackintos याने आणखी २ हजार फौज  मागवली होती. कॅ. Mackintos च्या फौजेतील साडेतीन हजार सैन्यांचा खात्मा केला आणि आपले ४०० सैनिक गमावले. इतके प्रयत्न करूनसुद्धा रतनगड हातातून गेला. या लढाईत गोविंदराव खाडे आणि रामाजी भांगरे यांना अटक करण्यात आली. पुढे खटला चालवून रामाजी भांगरे यांना काळ्या पाण्याची शिक्षा करण्यात आली.

वडिलांच्या अनुपस्थितीत राघोजी आपल्या गावात पोलीस पाटील पदाचा कारभार पाहत होते. आपल्या चोख कारभारामुळे राजूर पोलीस ठाण्यात राघोजींनी इतरांपेक्षा अधिक मान - सन्मान होता. राजूर प्रांताच्या रिकाम्या असलेल्या पोलीस अधिकारी या पदासाठी राघोजींनी अर्ज केला, पण इंग्रजांनी हा अर्ज फेटाळून अमृतराव कुलकर्णी यांची नेमणूक केली गेली. कोकणातील एका दरोडा प्रकरणात खोटा अभिप्राय राघोजींचा या मध्ये समावेश आहे असा अमृतराव कुलकर्णी याने सरकारला पाठवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेसा तपास न करताच राघोजींना अटक करण्याचा आदेश काढला गेला. राघोजी पोलीस ठाण्यात हजार होऊन या खोट्या आरोपाचा जाब विचारला असता या मध्ये राघोजी आणि कुलकर्णी बाचाबाची झाली. या वादात अमृतराव कुलकर्णी मारले गेले. हे पाहून बाकीचे हवालदार तिथून पळून गेले. राघोजींनी पोलीस ठाण्यातील ७ रायफल व काडतुसांची पेटी हातात घेतली. कारण राघोजी यांना इंग्रजांनी केलेल्या अन्यायाचा राग आला होता. त्या नंतर त्यांनी आई चा आशीर्वाद घेऊन घर सोडून बाडगीच्या घनदाट जंगलात गेले. त्यांच्या सोबत नेमबाजीत तरबेज असलेला राया ठाकर तसेच देवाजी आव्हाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत होते.

राघोजी भांगरे याचे संघटन कौशल्य खुपच चांगले आणि त्याच्या कार्याची जाणीव सर्वांना असल्याने आठ दिवसात मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण म्हणजे प्रवरा खोरे, बारागाव पठार म्हणजे प्रवरा खोरे या परिसरातून विविध जाती-जमातीचे अनेक तरुण मंडळी त्यांना येऊन मिळाले. अन्यायी, अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजीच्या नेतृत्वाखाली सर्वजण करू लागले. जंगलात राहून वेळप्रसंगी भाजी-भाकरी, चटणी खाऊन तर कधी उपाशी पोटी राहून जनसंपर्क करत होते. सरकारवर अवलंबून राहू नका, सरकारला कोणताही कर देऊ नकातुमचा कर राघोजी यांना द्या. ते तुम्हाला मदत करील असे आवाहन सगळीकडे करण्यात येऊ लागले. अगोदरच सावकारांच्या जाचाला इंग्रजांच्या अन्यायी धोरणाला वैतागलेले सामान्य लोक न्याय मागण्यासाठी राघोजीकडे येऊ लागले.

आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार इंग्रज सरकारचे वैरी आहोत

परिसरातील सर्व जुलमी अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या त्यांची धन संपदा लुटून गोर-गरीबांना वाटून टाकली. तसेच सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे कागदपत्र दस्त ऐवज यांची होळी केली. आया-बहिणींवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान- नाक कापले. हजारो-लाखो एकर जमिनी सामान्य लोकांना परत मिळवून देण्याचे काम राघोजी यांनी केल्याने सावकार इंग्रजांवर त्याची दहशत बसली होती.

राघोजी भांगरे यांचा सावकारशाही विरोधातील हा लढा अधिक व्यापक स्वरूप घेत असताना त्यांना नाशिक, ठाणे, पुणे या भागातूनही निरोप येऊ लागले होते. हे सर्व करत असताना धोकेही वाढत होते याची जाणीव राघोजीला झाली होती. तसेच आपले संघटन अधिक सक्षम मोठे करण्याचे आवाहनही त्याच्यासमोर होते. एकीकडे संघटन वाढवत दुसरीकडे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण या भागातील सावकारशाहीचा बिमोड केला. यानंतर राघोजीने बाडगीच्या माचीमध्ये असलेले आपले निवासस्थान अलंग कुलंग या दुर्गांवर हालविले.

नाशिक परिसरातील त्याच्या बंडाचे वर्णन पुढील ओव्यांतून आपणास दिसून येते.

झाडामधी झाड उंच पांगा-याचा राघूनं केलं बंड नाव सांग भांग-याचा !!

राघूनं केलं बंड नितरोज हरघडी कत्तल केली पोलिसांची मुंड्या लावल्या हो झाडो-झाडी !!

राघूनं केलं बंड कुलंग गडाच्या माळीला गो-या साहेबांच्या टोप्या ह्या गुंतल्या हो जाळीला !!

राघूनं केलं बंड बंड घोटी खंबाळ्याला धरणी काय आली कोंभाळण्याच्या बांबळ्याला !!

राघूनं केलं बंड बंड तीरंगळ गडाला यानं बसविला हादरा इगतपुरी या पेठाला !!

राघूनं केलं बंड बंड गौराया पुराला कापली गो-यांची नाकं कान टीळा रक्ताचा लावला !!


राघूनं  केलं बंड सरकार बोलू लागला

राघूनं केलं बंड बंड टाके देवगावाला वैरी त्रिंबक कांदडी यमसदनी धाडीला !!

राघूनं केलं बंड अंजनेरी या गडाला यानं बसविला हादरा गाव तिरमक पेठाला !!

राघूनं केलं बंड बंड सुरगाणा पेठाला कापलीया नाकं लुटलं सावकारशाहीला !!

राघूनं केलं बंड बंड पेठ तालुक्याला कापलीया नाकं चहू मुलुखी गाजला !!

राघूनं केलं बंड सप्तशृंगीच्या गडाला यानं बसविला हादरा दिंडोरी या पेठाला !!

राघूनं केलं बंड नाशिक हवेली लुटली काढून लग्नाची वरात नाकं वाण्याची कापली !!

राघूनं केलं बंड हादरा नाशिक पेठाला इंग्रज सरकारला याने धडा शिकविला !!

राघोजी भांगरे यांची ताकद दरारा आता अधिक वाढला होता. आज पर्यंत इंग्रजांशी छुप्या मार्गाने आपण लढत आलो आहोत, आता समोरासमोर दोन हात करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती. सन १८४५ मध्ये चार जिल्ह्यांचे कलेक्टर, गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट राज्यपाल एलफिंस्टन यांना जुन्नर येथे आपण जाहीर उठाव करणार असल्याचे पत्रही पाठविले. सदर उठाव मोडीत काढण्याचे आवाहनही त्याने पत्रांतून इंग्रज सरकारला केले होते. जुन्नर हि त्या काळात एक महत्त्वाची बाजारपेठ असल्याने इंग्रजांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. या उठावाला सामोरे जाण्यासाठी राघोजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी धूर्त धाडसी अधिकारी कॅप्टन Mackintosh याच्यावर सोपविण्यात आली.

कॅप्टन Mackintosh याने जुन्नरच्या बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केला हा उठाव कसा रोखायचा राघोजी कसा जाळ्यात अडकावायचा याचे नियोजन केले. यासाठी सोबत त्याने दहा हजारांची फौज तोफखाना घेतला होता. तिकडे राघोजीकडे फक्त दोन हजार सैनिक होते. शेवटी ठरलेला दिवस उगवला. राघोजी भांगरे त्याच्या सर्व साथीदारांनी जुन्नरच्या बाजारपेठेतहर हर महादेवची गर्जना करत प्रवेश केला. कॅप्टन Mackintosh ने जुन्नरला बाहेरून वेढा दिला राघोजी भांगरे आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी हालचाली सुरु केल्या. दोन्ही सैन्य समोरासमोर येताच एकच लढाई सुरु झाली. राघोजीचे मावळे आपले सारं देहभान हरपून लढत होते. एकीकडे कॅप्टन Mackintosh ची फौज कमी कमी होत होती तर दुसरीकडे राघोजीचे शंभर एक मावळे शिल्लक राहिले होते. देवजी आव्हाड यांनी वस्तुस्थितीचे भान राघोजीच्या लक्षात आणून दिले. ८०% फौज कामी येऊनही कॅप्टन Mackintosh च्या हाती राघोजी भांगरे लागला नव्हता. जुन्नरच्या बाजारपेठेचा फायदा उठवत तो सहीसलामत बाहेर पडला होता.

जुन्नरच्या उठावात मोठ्या प्रमाणात साथीदार गमावल्याने राघोजी दुखी झाले होते. आता भूमिगत राहून काम करण्याचा निर्णय घेतला. राया ठाकर देवजी आव्हाड यांच्या सोबत त्यांनी गोसाव्याचे रूप धारण केले. मावळ प्रांतात गावोगावी फिरून लोकांना जागृत करण्याचे काम करू लागले. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपये गाव ईनाम देण्याची घोषणा केली होती.

महानायक राघोजी फिरता-फिरता पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनाला पोहचला. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. बारीत उभे असताना दुरून एक पोलीस राघोजीचे निरीक्षण करत होता. राघोजीचे मात्र त्या पोलिसाकडे लक्ष्य नव्हते. पोलिसाला दर्शन रांगेत राघोजी भांगरे उभा असल्याची खात्री पटली. क्षणाचाही विलंब करता त्याने कॅप्टन गिलला निरोप दिला. त्यावेळी गिलची नेमणूक तिथेच होती. निरोप मिळताच कॅप्टन गिल शेकडो पोलिसांना घेऊन मंदिरात हजर झाला. सर्वांनी राघोजीला वेढा दिला त्याच्याकडे बंदुका रोखल्या. राघोजी निशस्त्र असल्याने तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. साखळदंडात कैद करून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात राघोजीला ठाण्याच्या कारागृहात आणण्यात आले. त्याच्यावर खटला भरण्यात आला. राघोजी भांगरे याच्या कोणत्याही मताचा विचार करता एकतर्फी निकाल घोषित करण्यात आलादुर्दैव म्हणजे राघोजीला वकील मिळू नये म्हणून इथल्याच उच्च वर्णीय लोकांनी प्रयत्न केले होते. कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जाहीर केली. राघोजीला फाशी देण्यापूर्वी वरिष्ठ इंग्रज अधिका-यांनी राघोजी भांगरे हा एक महान, शूर, लढवय्या, धाडसी वीर असल्याने त्याचे तैलचित्र काढून कारागृहात लावण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला देखील इथल्या उच्च वर्णीय लोकांनी हाणून पाडले. फाशीपूर्वी राघोजीला शेवटची इच्छा विचारण्यात आली.

 "फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या"

असे त्यांनी इंग्रज अधिका-यांना ठणकावून सांगितले. शेवटी दि. मे १८४८ रोजी ठाणे येथील कारागृहात राघोजीला फाशी देण्यात आली. अशा प्रकारे हसतहसत सह्याद्रीचा वाघ आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाले.

(सर्व माहिती wikipedia आणि इतर गुगल माहिती)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25