एका जिवलग आत्म्याची गोष्ट

जागतिक हस्ताक्षर दिन विशेष!
|| नित्य लिहा पाच ओळी, खुलेलं अक्षराची कळी ||
२७ फेब्रुवारी हा दिवस आपण "मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करतो तसाच २३ जानेवारी "जागतिक हस्ताक्षर दिन".
आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण ४८ मुळाक्षरे आहेत. या मूलक्षरांचा वापर करून आपली मराठी भाषा बनते. लोकसंख्येनुसार मराठी भाषा ही भारतातील ४थी आणि जगातील १५वी भाषा आहे.
भारत हा लिपीप्रधान देश आहे. येथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या आणि लिहिल्या जातात. प्रत्येक लिपीचे सौंदर्य वेगवेगळे आहेत. दोन हाताक्षर प्रेमी जेंव्हा एकत्र येतात, तेंव्हा त्यांच्यात मैत्री होते. ते अक्षरमित्र बनतात.
माझं ५वी पर्यंतचे हस्ताक्षर खूप विचित्र होते. माझे हस्ताक्षर पाहून घरचे बोलायचे काय मांजरीचा पाय कुत्र्याला आणि कुत्र्याचा पाय मांजरीला.... मला ही वाईट वाटायचं. दुसऱ्याचं सुंदर हाताक्षर पाहून माझ्या मनाला ही वाटायचं माझं पण हाताक्षर असेच सुंदर असावं. ५वीत असताना भालेराव गुरुजी आम्हाला चित्रकला शिकवायचे. त्यांना मी ही गोष्ट सांगितली, तसे ते खुप छान स्वभावाचे होते. नेहमी चांगल्यागोष्टी सांगत. ते म्हणाले दुकानातून एक रेखीव अक्षरांची पाटी घे, त्या वर पेन्सिल ने रोज २० वेळा गिरव. (जसे असेल तसेच त्या वर लिही)
मी पाटी घेतली रोज सकाळी आणि शाळेतून घरी आलो की सराव करायचो, त्याच बरोबर उभी रेषा, आडवी रेषा-तिरपी रेषा, पूर्ण गोल - अर्धा गोल याचा सराव आणि तसेच अक्षर पाहून शाईच्या पेनाने वही वर लिहू लागलो. थोडं बरं वाटायचं, कारण माझं हाताक्षर चांगले येत होते. "बॉल पेन पेक्षा शाईचा पेनाने अक्षर चांगले येते".
नंतर १२वी पर्यंत मी शाईचा पेन काही सोडला नाही. खुप उपकार ते भालेराव गुरुजी आणि अक्षरपाटी.
आणि खाली दिलेल्या नियमांचा उपयोग केल्यावर कमी वेळात हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल.
१. पेन धरताना टोकापासून २ ते २.५ सेमी मागे धरावे.
२. अक्षरांची उंची निबच्या जाडीच्या ५ ते ६ पट असावी.
३. उकार, रफार, वेलांटी, मात्रा यांची उंची अक्षराच्या उंचीच्या निम्मी असावी.
४. अक्षरातील तिरप्या रेषा ४५ अंशामध्ये असाव्यात.
५. अक्षरातील उभ्या रेषा एकमेकांस समांतर असाव्यात.
६. अक्षरावरील आडवी रेषा व उभी रेषा एकमेकांस काटकोनात असाव्यात.
७. अक्षरांची वळणे गोलाकार असावीत.
८. लिहिताना डावीकडून किंव्हा समोरून योग्य प्रकाश येईल असे बसावे.
९. दोन ओळीमधील अंतर अक्षरांच्या उंची एवढे किंव्हा त्यापेक्षा थोडे जास्त असावे.
१०. वही-कागद अश्या पद्धतीने धरावे की आडव्यारेषा डोळ्यांना समांतर येतील.
अक्षरांचे काळेपणा | टंकाचें ठोसरण | तैसेचि वळण वांकाण | सारिखेंची |
आजच्या संगणकाच्या युगात हस्ताक्षर कला लोप पावते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
माझा भाचा आर्यन ९वीत आहे. पण अजून त्याला नीट मराठी लिहिताही येत नाही आणि वाचताना खूप हळू वाचतो, कारण त्याच इंग्लिश मेडिया शिक्षण चालू आहे. मात्र इंग्लिश धडाधड वाचतो आणि लिहितो, शिवाय इंग्रजी सर्वच कविता तोंडपाट, मात्र मराठी कविता म्हटले की कानकूच करतो. (वरचे दहा नियम ऐकतो पण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने.......)
खरंच.... मराठी भाषा आणि हस्ताक्षर लोप पावत चालला आहे......
टिप्पण्या