एका जिवलग आत्म्याची गोष्ट

गूगल पे, फोनपे, पेटीएम, बीएचआयएम (BHIM UPI) प्रकारच्या अॅप्सवर(Apps) दुसर्या व्यक्तीकडून पैशाची विनंती करण्याचा एक पर्याय आहे, ज्याचा फायदा फसवणूक करणार्यांनी घेतला आहे. असे म्हणा की आपण एखाद्या व्यक्तीस आपण विक्री करू इच्छित असलेल्या उत्पादनासाठी देयकाची अपेक्षा करीत आहात परंतु आपल्याला ती रक्कम देण्याऐवजी ती व्यक्ती त्या रकमेची देय विनंती पाठवते.
हे फक्त इंटरनेट, न्यूज पेपर, न्यूज चॅनेल / Whatsapp वर पाहिले / ऎकले असणार. आज प्रत्येक्ष माझ्यासोबत हे झाले आहे. हे लोकं कसे फसवतात / काय बोलतात / किती वेळात समोरच्या माणसाला वेडे करतात अथवा फसवतात हे थोडक्यात पाहू.
आपले दैनंदिन जीवनात इतके Busy असतो कि काही घटना असे होतात कि ते लवकर लक्षात येत नाही. साधे गाडी चालवत असताना देखील जीवाची पर्वा न करता मोबाईल फोन चा वापर होतो, इतके आपण Busy असतो. खेळ फक्त २ सेकंद मध्ये होऊन जातो, जेंव्हा हा खेळ पूर्ण होतो तेंव्हा पचताव्याशिवाय आपल्याजवळ काही उरत नाही.
आपल्यापैकी बर्याचजणांना हे माहित आहे की UPI सारखे Apps कधीही आपल्या बँक खाते, कार्ड किंवा ओटीपी तपशील अज्ञात कॉलरसह सामायिक करू नये. परंतु आपणास माहित आहे की फसवणूकी करणारे या तपशिलाशिवाय आपले घोटाळे देखील करु शकतात? विनंती पैशांची (Request Money Fraud ) फसवणूक वाढतच चालली आहे, आणि फसवणूक करणार्यास आपला फोन नंबर माहित असला तरीही आपण बळी होऊ शकता.
सकाळी ११ची वेळ, आई ला दवाखान्यात घेऊन गेलो, तिच्या दातांचा प्रॉब्लेम (दाढ काढायला आई आत गेली) मी आपले काउंटर बसलो, या कामासाठी खास सुट्टीच घेतली होती. वेळ लागणार म्हणून मोबाईल वर मराठी Live News बघत होतो. इतक्यात एक कॉल आला. Unknown number होता, बरोबर १० अंकी.
समोरचा म्हणाला "मैं फोन पे कंपनी सें बात कर राहा हुं" (मला या बद्दल पहिल्यांदा कॉल आला आणि समजले नक्कीच फसवणुनिकाचा कॉल असणार. म्हणून मी पण त्याला भोळेपणाने बोलू लागलो. जसे कि मला काहीच माहिती नाही असे.
(भाषा १००% बिहारी होती)
तो : फोन पे से आप को ४२००/- दे जा रहे हैं।
मी : किस बात के पैसे दे रहे हो भैय्या ?
तो : जी, Lockdown के कारण कंपनी आप को दे रही है । आप को चाहिए या Cancel कर दु ?
मी : चाहिये तो हर किसी को भैय्या, पर मुझे क्या करना होगा?
तो : फोन पे Open करो, फोन पे पर आप को एक Notification आयी होगी, जरा Check करो...
मी : फोन पे Open न करता म्हणालो, नाही मुझे कोई Notification नाही आया.
(जेंव्हा आमचे संभाषण संपले तेंव्हा मी फोन पे Open करून पाहिले, त्याने मला Request Money केली होती)
तो : जरुर आयी होगी, दोबारा Check करो.
मी : भैय्या, Notification तो आया हि होगा पर में फसनेवाला नाही हू. अबतक कितने गरीब लोक हात आए?
तो : (काही न बोलता तो लगेच कबूल झाला, हासत-हासत म्हणाला कि) अरे यार..... रख फोन बात करके क्या फायदा, और भी बहोत सारा काम है मुझे.
मी: फोन तो रखनेही वाला हू पर ये तो बाता दिन मे कितना कमा लेते हो?
तो : वैसे तो, कुछ खास नाही दिन मे ५ - ६ लाख.
(मी हे ऐकून खूप चकित झालो)
मी: भैय्या, Lockdown के कारण गरीब आदमी मर रहे है, कैसे कैसे करके २ पैसे कमाके जी रहे है, और आप उनकी मेहनत कि कमाई खा रहे हो? क्या उनकी बद्दूवा नही लगेगी?
तो: ओ......., ज्ञानी पुरुष अपना भाषण आपनेही पास रख, तू नही फसा, दुसरा कोई फस जायेगा.
हे बोलून त्यानेच कॉल कट केला. मी लगेच फोन पे चा पासवर्ड Change करून. फोन पे App Mobile मधून Remove केले आणि आलेला नंबर ब्लॉक करून टाकला. हे संभाषण फक्त २ मिनिट चे होते, असे लोक आपला Mobile सुध्दा hack करू शकतात. हे ते कसे करतात अजून या बद्दल कोणालाच काही माहित नाही.
टिप्पण्या