दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी
बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर
वेळापत्रकानुसार इ.१२ वीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहेत तर इ.१० वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ रोजी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Boards of Secondary and Higher Secondary Education) वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १०वी बोर्ड (10th 12th Board Exam) परीक्षांच्या नियोजित तारखा जाहीर (Scheduled dates of exams announced) करण्यात आल्या आहेत. वेळापत्रकानुसार इयत्ता १२वीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहेत तर इ. १०वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ रोजी होणार आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या ३र्या आठवड्यात व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र [इ.१०वी] परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. या परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या ३ऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता १२वी व इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्या अनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद करण्यात आहे आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र [इ.१२वी] परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा मंगळवार ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५, तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन शुकवार २४ जानेवारी ते सोमवार १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र [इ.१०वी] लेखी परीक्षा शुक्रवार २१ फेब्रुवारी ते सोमवार १७ मार्च २०२५ आणि प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन, सोमवार ३ फेब्रुवारी ते गुरूवार २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडणार आहे.
टिप्पण्या