एका जिवलग आत्म्याची गोष्ट

आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया
(शाळा नोंदणी नंतर पालकांना फॉर्म भरता येतात)
आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया २३ जानेवारी पासून ते ३ फेब्रुवारीला पर्यंत. (तारीख पुढे मागे होऊ शकते)
शिक्षण हक्क कायदाअंतर्गत (आरटीई) पुढील शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील खाजगी शाळांमधे आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या २५ % (टक्के) जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या नुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. हि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पालकांना अर्ज करता येणार आहे.
तर पालकांनी अर्ज कसा करावा, कुठे करावा, त्या साठी कोण-कोणते कागतपत्र लागतात किंव्हा असायला हवेत ते आपण जाणून घेऊ.
त्या आधी RTE नेमके काय त्या संदर्भात जाणून घेऊ.
RTE चे आरक्षण नेमकं काय आहे?
गरीब दुर्बल वंचीत घटकातील विद्यार्थी त्याचा कसा फायदा घेऊ शकतात ?
RTE ( राईट टू एज्युकेशन )
विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत हे सर्व प्रवेश दिले जातात.
पण त्यासाठी कोण पात्र असतं, कोणत्या अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवू शकतो, याची सविस्तर माहिती आपण घेऊ.
शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण याची माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम आपण त्या संदर्भातील कायद्याची माहिती घेऊ.
केंद्र सरकारने 2009 साली राईट टू एज्युकेशन म्हणजेच RTE कायदा पारित केला आहे. संविधानातील कलम 29 आणि 30 च्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम "बालकांना" लागू करण्यात आला. बालक म्हणजे 8 ते 14 वयोगटातील मुलं. अशी व्याख्या यामध्ये करण्यात आली आहे.
RTE कायद्या अंतर्गत विद्यार्थींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात शिक्षणाचा आधिकार, पालकांचं कर्तव्य आणि इतर अनेक गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
याच कायद्यात कलम 12(1) (सी) नुसार, खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचीत आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
खाजगी शाळांमधील या 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी मोफत असतं. त्यासाठी रक्कम सरकारमार्फत शाळांना देण्यात येते.
RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण
देशात RTE कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये त्याची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी आधीसुचना काढली.
प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे
टीप:- आर.टी.ई. २५ % online प्रवेशाकररता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकाांनी online प्रवेश अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यन्त असावीत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:-
कागदपत्राचा प्रकार :
१) रहिवासी / वास्तव्याचा पुरावा. (सर्व प्रवेशपात्र बालकांसाठी)
वैद्य कागदपत्रांची सूची :
रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालवण्याचा परवाना), वीज / टेलिफोन बिल देयक, पाणी पट्टी, प्रॉपटी टॅक्स देयक घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट. या पैकी कोणतेही एक. निवासी पुरव्याकरिता Gas बुक (पुस्तक) रद्द करण्यात आलेले आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
कागदपत्राचा प्रकार :
२) वंचित जात संवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र. (वडिलांचे / बालकांचे)
वैद्य कागदपत्रांची सूची :
उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार / उपजिल्हाआधिकरी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे जात प्रमाणपत्र. पालकांच्या (वडिलांचा / बालकांचा) जातीचा दाखला आवश्यक. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
कागदपत्राचा प्रकार :
३) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला.
वैद्य कागदपत्रांची सूची :
तहसीलदार / महसूल अधिकारीचे प्रमाणपत्र, वेतन पावती (Salary Slip), कंपनीचा किंव्हा Employer चा दाखला. ( आर्थिक वर्ष २०२१-२०२२ किंवा २०२२-२०२३ मार्च अखेरचे एक लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.
कागदपत्राचा प्रकार :
४) एकल पालकत्व असल्यास (Single Parent) आवश्यक कागदपत्रे.
वैद्य कागदपत्रांची सूची :
आई किंवा वडील या पैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे ग्राह्य.
कागदपत्राचा प्रकार :
५) अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे.
वैद्य कागदपत्रांची सूची :
अ) बालगृह / अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.
ब) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याची सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहिल.
कागदपत्राचा प्रकार :
६) HIV बाधित / प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे.
वैद्य कागदपत्रांची सूची :
जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र.
कागदपत्राचा प्रकार :
७) दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे.
वैद्य कागदपत्रांची सूची :
जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्के आणि ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यासचे प्रमाणपत्र.
कागदपत्राचा प्रकार :
८) जन्माचा दाखला. (सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता)
वैद्य कागदपत्रांची सूची :
ग्रामपंचायत / न. पा. / म. न. पा. यांचा दाखला / रुग्णालयातील ANM Register मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्व्यारे केलेले स्वयंनिवेदन.
कागदपत्राचा प्रकार :
९) घटस्फोटीत महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे.
वैद्य कागदपत्रांची सूची :
अ) न्यायालयाचा निर्णय
ब) घटस्फोटीत महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
क) बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्न असलेला दाखला.
कागदपत्राचा प्रकार :
१०) न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटीत प्रकरणातील महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे.
वैद्य कागदपत्रांची सूची :
अ) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.
ब) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
क) बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्न असलेला दाखला.
कागदपत्राचा प्रकार :
११) विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे.
वैद्य कागदपत्रांची सूची :
अ) पतीचे मृत्यूपत्र (प्रमाणपत्र)
ब) विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
क) बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्न असलेला दाखला.
१२) आधारकार्ड
वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपत्र बालकांकरिता आवश्यक :-
आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी / पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे / पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा.
सदर बालकाच्या आधारकार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर.टी. इ. २५ टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.
पुणे जिल्हा मध्ये ९३५ RTE शाळा असून १५६१२ इतक्या RTE जागा शिल्लक आहेत.
मुंबई + नवी-मुंबई मध्ये २७२ + ६५ शाळा - अनुक्रमे ५२०२ - १३६७ जागा शिल्लक आहेत.
ठाणे - ६२९ शाळा - १२२७८ जागा.
२०२४-२५ मध्ये बदल होऊ शकतो.
RTE 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024-25 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक अजून जाहीर झालेला नाही.
तारीख जेव्हा जाहीर होईल तेव्हा या वेसाइटवरून तुम्हाला RTE फॉर्म भरता येईल.
आवश्यक टीप:
ज्या बालकांनी यापूर्वी RTE २५ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल.
तसेच पालकांनी एकच अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्यास सदर अर्ज विचारत घेतला जाणार नाही. अश्या पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
इतर काही माहिती
RTE- २००९ ची कलमे व १० मानके
सदर अधिनियम १एप्रिल २०१० पासून लागू झालेला आहे.त्याच दिवसापासून ८६ व्या घटनादुरूस्ती नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त झाल्याचेही अधिसुचित करण्यात आले. सदर अधिनियमात एकूण ३८कलम आहेत.
त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध.
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता.
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष.
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार.
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती.
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना.
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.
RTE ची १० मानके
१) मुख्याध्यापक कार्यालय
२) शिक्षकांच्या प्रमाणात वर्गखोल्या
३) स्वयंपाकगृह (किचनशेड)
४) क्रिडांगण
५) स्वतंत्र स्वच्छतागृह
६) पिण्याच्या पाण्याची सोय
७) ग्रंथालय
८) रँम्प सुविधा
९) शैक्षणिक साहित्य
१०) क्रिडा साहित्य
टिप्पण्या