एका जिवलग आत्म्याची गोष्ट

तुम्ही आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन सोडत कधी निघणार या प्रतीक्षेत असाल, तर मग इकडे नक्की लक्ष द्या. शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत येत्या बुधवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार होती, सिलेक्शन यादीतील प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ नंतर एस एम एस (Sms - Text Message) पाठवले जातील.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार (आरटीई), दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे एक लाख एक हजार ९६९ जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख ६४ हजार ४७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल.
• राज्यातील आरटीई शाळा : ८,८२८
• प्रवेशासाठी उपलब्ध जागा : १,०१,९६९
• आलेले अर्ज : ३,६४,४७२
जिल्हा: आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : प्रवेशासाठी आलेले अर्ज (अनुक्रमे खालील प्रमाणे)
नगर: ३६४ : २,८२५ : ९,७३१
औरंगाबाद: ५४७ : ४,०७३ : २०,७७९
जळगाव: २८२ : ३,१२२ : ११,२९०
नागपूर: ६५३ : ६,५७७ : ३६,४९०
नांदेड: २३२ : २,२५१ : ११,११०
नाशिक: ४०१ : ४,८५४ : २१,९४८
पुणे : ९३६ : १५,६५५ : ७७,५३१
ठाणे : ६२९ : १२, २७८ : ३१,६७९
तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पण्या