पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

शाळेच्या गमती-जमती भाग १

इमेज
माझी  आवडती शाळा..... (Nirgude, Tal. Junnar, Dist. Pune) १९९४ ते १९९६-९७ छान वाटतं बोलवायला ना कि फक्त शाळा जरी म्हणते तरी आपले मन लगेच आपल्या बालपणात जातं. आपली शाळा आठवते. आपले जवळचे मित्र, जीव लावणारे शिक्षक आणि सर्वात महत्वाचे मार देणारे शिक्षकही आठवतात. "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" खरच ते खुप गोड दिवस असायचे. हे आत्ता समजायला लागलं, पुन्हा ते दिवस येणे नाही. शाळेत असताना मस्ती मौज-मजा खुप असायची. तेवढेच मस्करी-भांडणही असायचं. आपले शिक्षक आपल्याला सतत मारतात हे त्या वेळेस खुप वाईट वाटायचे, पण आत्ता समजले तो मार आपल्यासाठीच खुप महत्वाचा असायचा. शिक्षक विनाकारण कधीच मारत नसायचे. अपूर्ण गृहपाठ, पाढे पाठ नाही, शाळेची दांडी, शाळेत उशीरा येणे वैगरे कारणे असायचे आणि असे एक-एक किस्से असायचे की आत्ता आठवले तरी गालातल्या-गालात हसायला येत. आपल्या शाळेचा वर्ग म्हणजे सर्वात पुढच्या बाकावर बसलेले आपले मित्र म्हणजे सर्वात हुशार गणले जायचे. मध्यम भागात बसलेले ना हुशार ना ढ, आणि मागच्या बाकावर बसलेले काही विचारायला नकोच, त्यांची गणना मस्तीखोर-भांडखोर, "ढ" अशीच असायची....

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25