पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

शिवनेरी किल्ला, शिवनेरी ट्रेकिंग

इमेज
शिवनेरी फोर्ट, शिवनेरी ट्रेक मूलभूत माहिती: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व आहे. पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. शिवनेरी किल्ला हा  किल्ला एक दिवसाच्या सहलीसाठी आदर्श आहे आणि मध्यम ट्रेकिंगचा अनुभव आवश्यक आहे. किल्ल्याच्या शिखरावर जाण्यासाठी सात दरवाजे आहेत. ट्रेकचे दोन पर्याय आहेत, एक पायऱ्यांनी आणि दुसरा साखळ दांडीच्या वाटेने !  शिवनेरी किल्ल्याचा दरवाजा शिवनेरी येथे खूप शोध लावले गेले आहे आणि जे लोक ऐतिहासिक स्थळांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी हे आदर्श आहे. कसे जावे: शिवनेरी मध्य पुण्यापासून सुमारे १००-११५ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून जुन्नर गावी जावे लागते. कल्याण पासून ११३ कि. मी. आपले स्वतःचे वाहन असल्यास आपण जिथे वाहने उभी करता येतील अशा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी चालवू शकता. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणार्‍या लोकांना किल्ल्याच्या पायथ्याकडे जाण्यासाठी जुन्नरपासून सुमारे २ कि.मी. चालणे आवश्यक आहे. शिवनेरी येथे काय पाहावे:  गडावर अनेक ठिकाणी पर्यटन स्थळं पाहायला मिळतात. ■  शिवाई मंदिर -...

अरे वेड्या माणसा

अरे वेड्या माणसा.... मीच फक्त चांगला आहे  बाकी सगळे वाईट तुम्हीच सांगा ही भूमिका Wrong आहे का Right ? स्वतःला " हिरो " ठरवतांना दुसऱ्याला " व्हिलन " करू नको विनाकारण गाऱ्हाणे करत  इकडून तिकडे फिरू नको टोमणे मारणे , कुत्सित हासणे असले धंदे का करतो ? " मीच शहाणा बाकी वेडे " नावं ठेवीत का फिरतो ? पुढच्या क्षणी काय घडणार कुठे कुणाला माहीत असतं विकेट कशी , कधी पडणार कुणालाही ठाऊक नसतं अपॉइंटमेंट घेऊन कधी यमराज घरी येतो का ? गयावया केली म्हणून कुणाला सोडून देतो का ? यमा तुझ्या रेड्यावर मी डबलसीट बसणार नाही ठीक आहे बसू नकोस  असं कधीच असणार नाही मनात असो किंवा नसो यमाच्या मागे बसावंच लागतं श्रीराम जयराम म्हणत म्हणत मसनवाट्यात जावंच लागतं  चोवीस तासाच्या आत तुला रॉकेल टाकून फुकुन देतील कवटी फुटो न फुटो घरी लवकर पळून जातील मूर्ख माणसा त्याच्यामुळे प्रत्येक क्षण जगून घे सखी सोबत पावसा मध्ये चिंब चिंब भिजून घे घर घर काम काम चोवीस तास तेच ते इतकं सोनं , तितके पैसे वेड्या माणसा सोडून दे घण्याच्या बैला जागा हो थोडी तरी मजा कर  ...

"इंद्रायणी नदी आणि मी"

इमेज
"इंद्रायणी नदी आणि मी" काल रविंद्र भट याची कादंबरी वाचत होतो,  "इंद्रायणीकाठी" छान आहे, आवडली. सारांश / संदर्भ ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील ही कादंबरी आहे. रविंद्र भट यांच्या रसाळ आणि ओघवत्या भाषेतून झालेले हे लेखन एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या विश्वात विश्वाची चिंता करणारे लहानगे ज्ञानदेव आहेत आणि ज्ञानेश्वरी लिहून जगाला प्रकाश दाखविणारे प्रगल्भ अधिकारी ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वरांची सर्वच रूपे अंतर्मुख करणारी आहेत. ज्ञानेश्वरांवर आजवर अनेकांनी लिहले आहे. मात्र, ज्ञानेश्वरांचे पूर्ण रूप या कादंबरीतून जसे उलगडले आहे, तसे क्वचितच कोणी! ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील घटना, प्रसंगांच्या साखळीतून त्यांचे जीवनसंबंधीचे तत्वज्ञान समोर येते. तेव्हा याच ओळी ओठावर येतात, अगा ज्ञानदेवा प्राज्ञ भागवता, आशीर्वाद देई पामरास आता. आज नेमकी रविवार, आणि आळंदीला जायचा बेत बायको चा झाला. आळंदी जवळ राहायला आहे कधी गेलो नाही आणि रोज कामावर जाण्यात वेळ जातो, कधीतरी फिरायला घेऊन जा, असा बायकोचे शब्द कानावर पडले. मग काय जावे तर लागणारच शेवटी बायकोचा ह...

लहान मुलं आणि मोबाईल

इमेज
पुस्तक वाचण्यापेक्षा लहान मुलांना एखादा विडिओ गेम खेळणे, युट्युब पाहणे जास्त आवडते. असे नेमके का होते असेल? याचे प्रमुख कारण म्हणजे पालक, हो... होय पालकच... आत्ताच्या पालकांना मुलांना सांभाळता येताच नाही, पूर्वीच्या काळात म्हणजे आत्ताच २०-२५ वर्ष झाले असतील घरात आई बाबा मुलगा सून असा लहान परिवार एकत्र राहत असत. आणि एक विशेष म्हणजे आजी आजोबा मुलांचा सांभाळ अगदी चांगल्या पद्धतीने करत. आजीला असलेला मुल संगोपनाचा अनुभव ती आपल्या सुनेला द्यायची.  आता एकत्र परिवार फार कमी ठिकाणी दिसतो, अजून १०-१२ वर्षात ते नाहीसे होणार आहेत. कोणाला सासू नको तर कोणाला सासरे नको. म्हणजे "आपल्या मुलाला आजी आजोबा नकोच" असा अर्थ होतो. आजच्या घरात असतात ती फक्त नवरा-बायको-मुल. मग मुलाकडे लक्ष द्यायला कोण ? साहजिकच आहे त्याचे आई आणि बाबा.  मुलं एक-दिड वर्षाचे झाले की त्यांनी घरात मस्त करू नये, पुस्तक फाडु नये, मध्ये मध्ये सारखं लुडबुड करू नये म्हणून त्याला प्री नर्सरी मध्ये पाठवले जाते. तिथे काय करतात, काय शिकवतात ते आपल्याला चांगलेच माहीत आहे. प्री नर्सरी ला पाठवायचे कारण म्हणजे आपण घरात नसतोच ...

हिंदी दिवस स्पीच - Hindi Day Speech

इमेज
आप में से ज्यादातर लोग जानते होंगे कि हिंदी दिवस हर साल 14 सितंबर को मनाया जाता है क्योंकि 1949 में इस दिन, भारतीय संविधान सभा ने हिंदी को अंग्रेजी के साथ हमारे देश की आधिकारिक भाषा के रूप में स्वीकार किया था। हल साल 14 सितंबर को हिंदी दिवस सेलिब्रेट किया जाता है। देशभर में हिंदी दिवस को वार्षिक समारोह के रूप में मनाया जाता है। हिंदी हमारे देश का राष्टीय भाषा है। साथ ही विश्व में बोली जाने वाली प्रमुख भाषाओं में से भी एक है। 14 सितंबर 1949 को भारत की संविधान ने गणराज्य की आधिकारिक भाषा के रूप में हिंदी को अपनाया। इसके अलावा हिंदी दिवस को 26 जनवरी 1950 को देश के संविधान द्वारा आधिकारिक भाषा के रूप में उपयोग करने का विचार स्वीकृत किया गया था। इस खास दिवस के मौके पर स्कूल-कॉलेज में छात्र भाषण देते हैं। साथ ही अपने भाषण के जरिए लोगों तक हिंदी दिवस सेलिब्रेट किए जाने के कारण को पहुंचाते हैं। स्पीच 1: भारत में हर साल 14 सितंबर को हिंदी दिवस सेलिब्रेट किया जाता है। पूरे देशभर के लोगों के लिए यह एक गर्व की बात थी क्योंकि इस दिन भारत की संविधान सभा ने हिंदी को देश की आधिक...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

शाळेच्या गमती-जमती भाग १

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस