एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

लहान मुलं आणि मोबाईल

पुस्तक वाचण्यापेक्षा लहान मुलांना एखादा विडिओ गेम खेळणे, युट्युब पाहणे जास्त आवडते. असे नेमके का होते असेल?

याचे प्रमुख कारण म्हणजे पालक, हो... होय पालकच...

आत्ताच्या पालकांना मुलांना सांभाळता येताच नाही, पूर्वीच्या काळात म्हणजे आत्ताच २०-२५ वर्ष झाले असतील घरात आई बाबा मुलगा सून असा लहान परिवार एकत्र राहत असत. आणि एक विशेष म्हणजे आजी आजोबा मुलांचा सांभाळ अगदी चांगल्या पद्धतीने करत. आजीला असलेला मुल संगोपनाचा अनुभव ती आपल्या सुनेला द्यायची. 

आता एकत्र परिवार फार कमी ठिकाणी दिसतो, अजून १०-१२ वर्षात ते नाहीसे होणार आहेत. कोणाला सासू नको तर कोणाला सासरे नको. म्हणजे "आपल्या मुलाला आजी आजोबा नकोच" असा अर्थ होतो. आजच्या घरात असतात ती फक्त नवरा-बायको-मुल.
मग मुलाकडे लक्ष द्यायला कोण ? साहजिकच आहे त्याचे आई आणि बाबा. 

मुलं एक-दिड वर्षाचे झाले की त्यांनी घरात मस्त करू नये, पुस्तक फाडु नये, मध्ये मध्ये सारखं लुडबुड करू नये म्हणून त्याला प्री नर्सरी मध्ये पाठवले जाते. तिथे काय करतात, काय शिकवतात ते आपल्याला चांगलेच माहीत आहे. प्री नर्सरी ला पाठवायचे कारण म्हणजे आपण घरात नसतोच व सकाळी मुलाला स्कूल मध्ये सोडून संध्याकाळी कामावरून आलो की मुलाला सोबत घेऊन येणे. हे झालं रोजचे गणित. आणि आई जरी घरात असली की तेच होत ! घरची कामं करायची का या लुडबुड करणाऱ्या मुलाला सांभाळायचे ?


लहान मुलाचे पाहिले शिक्षण आई बाबा कडून घेतात. आई चा जास्त वेळ व्हाट्सएपच्या आणि फेसबुकच्या पोस्ट साठी वेडेवाकडे चेहरे बनून फोटो काढण्यात जातो. हे लहान मुलाला ते पाहून काय वाटत असेल ? 

बाबा कामावरून घरी आले की मोबाईल गेम, विडिओ पाहत बसने यात वेळ घालवतात.
मुलं रडायला लागली की त्याला एखाद गाणं/विडिओ लावून दिला जातो, मग काय मुलगा जागीच शांत होतो, तो त्या मोबाईल मध्ये इतका रमतो की आपले आई बाबा कोण हे ५ वर्षानंतर लक्षात येत असेल.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

Corporate Management System

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं