नैसर्गिक आणि कृत्रिम आंब्यातील फरक कसा ओळखावा...
आंबा म्हणजे फळांचा राजा, त्याचा मधुर स्वाद, गोड चव, त्याच्या सुगंधाची दरवळ अनोखी असते.
लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे आंबा. आपल्या देशातच नाही तर भारताचा आंबा विदेशात देखील लोकप्रिय आहे.आंबा म्हणजे त्यापासून विविध पदार्थ बनविल्या जातात, त्यात आंब्याचा रस, आंबा पोळी, आंबावडी इत्यादी अनेक पदार्थ आंब्यापासून बनविले जातात. परंतु सध्या आंब्याची नक्कल करुन कृत्रिम आंबे बनविले जातात. हे कृत्रिम आंबे दिसायला आंब्यांसारखेच दिसतात, पण कापून पाहिल्यावर चवीला मुळीच गोड नाही आणि या आंब्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतात. पारंपारिक पध्दतीने गवताची आढी घालून ४-५ दिवस ठेवून पिकवण्याऐवजी कृत्रिम पद्धतीत ते काही तासात पिकवले जातात.
तुम्ही बाजारात गेल्यावर कसे ओळखाल आंबा नैसर्गिक आहे की कृत्रिम?
चला जाणून घेऊया.
१. रंग- नैसर्गिक आंब्यापेक्षा कृत्रिम आंब्यावर हिरवट डाग असतात. हे डाग केशरी किंवा पिवळ्या रंगात मिसळत नाही म्हणून ते अधिक उठावदारपणे दिसून येतात. हे कृत्रिम आंबे नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा अधिक पिवळसर दिसतात.
२. चव - नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले आंबे चवीला गोड लागतात, परंतु कृत्रिम पद्धतीचे आंबे गोड लागण्याऐवजी तोंडामध्ये जळजळ होते आणि हे आंबे खाल्यानंतर डायरिया, पोटदुखी आणि घशात खाज अशा शारीरिक समस्या उद्भवतात.
३. आंब्याच्या सालीवर नैसर्गिकपणे पिकलेल्या आंब्याप्रमाणे सुरकुत्या येत नाहीत. ते चमकदार आणि गुळगुळीत दिसतात.
४. हंगाम नसताना कुठलीही फळे खरेदी केली तर ती कृत्रिमरीत्या पिकवलेली असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो एप्रिल अखेरीपर्यंत आंबे खरेदी करू नयेत.
५. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंब्याचा खरा हंगाम सुरू होतो. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात येणाऱ्या आंब्यांना भुलू नये.
कृत्रिम आंब्याचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम
१. पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक फवाऱ्यामध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (कार्सिनोजेनिक) असतात. त्यामुळे शरीरातील विविध अवयवांना कर्करोग होऊ शकतो.
२. कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या आंब्यात अर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश राहतात. याचा परिणाम मेंदूवर होऊन डोक्यात जडपणा येणे, स्पर्शज्ञान आणि इतर संवेदनांमध्ये दोष निर्माण होतात.
३. कॅल्शियम कार्बाइडने फळे पिकवण्याचे काम करणाऱ्या मजूर वर्गात चक्कर येणे, मूड बदलणे, गोंधळल्यासारखे होणे, स्मृती कमी होणे असे असंख्य आजार आढळून आले आहेत.
४. कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा नियमितपणे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या मूत्रपिंडात, यकृतात रसायनांमुळे बिघाड होऊन त्यांचे कार्य मंदावते.
५. गर्भवती स्त्रियांनी असा आंबा खाल्ल्यास कॅल्शियम कार्बाइड पचनसंस्थेद्वारे गर्भाशयात जाऊन बाळामध्ये जन्मजात विकृती निर्माण होऊ शकतात.
६. अशाप्रकारे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने उलटी, जुलाब, सतत मळमळणे, चक्कर येणे असे त्रास वरचेवर होऊ लागतात.
टिप्पण्या