एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

कोरोनापासून वाचण्याचे १० प्रकार

कोरोनापासून वाचण्याचे १० प्रकार 

!! तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे !!

आज एक वर्ष उलटून गेलं, संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. पहिली लाट जात नाही तेच दुसऱ्या लाटेने कहर केला आहे.
तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. त्याचमुळे आपणच आपली जास्त काळजी घेतली पाहिजे.
लस आहे पण ती आपला १००% बचाव करू शकते का? नाही ना... कि तर नाही ? म्हणूनच आपल्याला कोरोनासोबत आपली काळजी घेत जगावं लागणारचं.

१. कोरोना वरची लस

कोरोना विरुद्ध लढायचे सर्वात महत्वाचे शस्त्र म्हणजे कोरोना वरची लस. लस तुम्हाला कोरोना संसर्ग होण्यापासून वाचवू शकते, तुमच्यात अँटी बॉडीज निर्माण करू शकते. पण कुठलीही लस हि १००% प्रभावी नाही, त्यामुळे लस घेतली तरी तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतोच, पण अर्थात ती शक्यता खूप कमी होते.


२. टेस्टिंग / चाचण्या  
कोरोना ग्रस्त रुग्णांचा शोध घेणे हि आजारी विरोधातली पहिली पायरी पण त्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट / चाचणी करणं महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे शोधून काढण्यासाठी टेस्ट / चाचणी हा एकमेव पर्याय आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या उपलब्धही आहेत.

कोरोना व्हायरस तुमच्या शरीरात आहे की नाही हे तपासण्यासाठी ३ प्रकारच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात.
अ. Rapid Antibody Test
ब. Rapid Antigen Detection Test
क. RT - PCR Test
या ३ प्रकारच्या चाचण्यांमध्ये RT - PCR Test ही कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे खात्रीशीर सांगू शकते.

३. ट्रेसिंग

एक कोरोना रुग्ण इतरांपासून वेगळा करणे आणि हा रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आला होता आणि आला आहे याचा शोध घेणे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे जर कोणी या रुग्णाच्या संपर्कात आले असेल तर याला वेगेळे करणे महत्वाचे आहे. कारण अशी साखळी होऊन एक व्यक्ती अनेक व्यक्ती ला संसर्गात अनु शकतो म्हणून त्या सुद्धा व्यक्तीला अलगीकरणात जाण्याचे अगदी महत्त्वाचे आहे. पण ट्रेसिंगसाठी पूर्णपणे प्रभावी व्यवस्था नाही. रुग्ण इतक्या झपाट्याने वाढत आहे कि सर्वच तंत्रज्ञान त्यासाठी कमीच पडत आहे.

४. विलगीकरण

जर कोरोनाची लक्षणे जाणवलीच तर अश्या व्यक्तीला विलगीकरण (वेगळे राहणे / राहण्याची जागा) करणे महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे तिथून प्रवास करून पुन्हा आपल्यानंतर सुद्धा घरी का होईना विलगीकरणात राहण्याचे अगदी गरजेचे आहे. पण सरकारने किती हि नियम / अटी केले तरी ते पाळले जात नाहीत. जर अलगीकरण आणि विलगीकरणचे नियम / अटी पळाले गेले तरच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात नक्कीच मदत होईल.

५. मास्क वापरणे

कोरोना हा आपल्या खोखला / शिंखेतुन बाहेर येतो, त्यासाठी मास्क लावणे हाच एक उपाय आहे. पण आपण पाहतच असतो आपले जवळचे मित्र-मंडळी / सहकारी भेटल्यावर बोलताना तो मास्क नाक सोडून तोंडावर, गळ्यात, हनुवटीवर लावताना बघतो. मग त्यामुळे कोरोना पासून आपला बचाव होणार नाही. 
मास्क लावणे हाच एक उपाय

६. सामाजिक अंतर / फिजिकल डिस्टन्स

जेव्हा भारतात कोरोना आला तेव्हा पासून आपल्याला सांगत आहे कि एकमेकांपासून साधारण सहा फूट (२ मीटर) तरी अंतर ठेवले पहिजे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवले तर कोरोना चा संसर्ग होऊ शकत नाही / कमी होऊ शकतो. पण आपण जेव्हा बाजारात, दुकानात, मॉल, हॉटेल, रेस्टोरंट, लग्न समारंभ, इतर काही कार्यक्रमात जातो, तेव्हा असे वाटते कि कोरोना जगातून कधीच निघून गेला आहे. पण प्रत्येक्षात तसे नसून एका कोरोना रुग्णापासून तिथे सर्वांना कोरोना संसर्ग होऊ शकतो.

७. हात वारंवार साफ / स्वछ करणे

हात साबणाने स्वछ करणे. आता तुम्ही बोलणार बाहेर असल्यावर हात कुठे धुणार? ते सारखेच शक्य नसले तरी आपण मेडिकल मधून एक सॅनिटायझर बाटली जवळ ठेऊन शकतो. बाजारात / दुकानात गेल्यावर पैश्यांची देवाण-घेवाण होते, तेव्हा आपले हात आपण स्वःता सॅनिटायझ करू शकतो.

८. मोकळी वा ताजी हवा

ताज्या हवेमुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. सूर्यकिरणांनमधले अल्ट्रावायलेट किरण पृष्ठभागारच्या विषाणूंना मारू शकतात. परंतु जागा मोकळी नसेल किव्हा हवा खेळती नसेल तर / कोंडत असेल तर मग संसर्गाचा धोका वाढत राहतो. 

९. खुले दरवाजे आणि खिडक्या

मोकळ्या हवेत संसर्गाचा घोका कमी असतो तर एसी मध्ये तो जास्त असतो त्यामुळे जिथे एकापेक्षा जास्त लोक असतील आणि एकत्र काम करतात (ऑफिस) तिथे दरवाजे - खिडक्या उघडे ठेवणे हा एक उपाय असू शकतो. 

१०. बाहेरून आल्यावर

बाहेरून घरी आपल्यावर आपली बॅग / हेलमेट / चप्पल - सँडल - शूज इतर काही वस्तू सॅनिटायझ करून जिथे कोणाचा स्पर्श होणार नाही त्या जागी ठेऊ शकतो. लगेच बाथरूम मध्ये जाऊन गरम पाण्याने आपले शरीर स्वछ करू शकतो. बाहेरचे कपडे / मास्क लगेच गरम पाणी / डेटॉलने स्वछ धुवून वळत टाकून देणे.

तर हे आहेत कोरोना पासून बचाव करण्याचे १० प्रकार पण हे सुद्धा लक्षात ठेवुयात कि यातला कुठला हि एक प्रकार आपल्याला कोरोना पासून १००% संरक्षण देत नाहीत पण एक आहे कि या सर्व गोष्टी पाळल्या गेल्या तर कोरोनाचा धोका अनेक पटीने कमी होऊ शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25