एका जिवलग आत्म्याची गोष्ट

काहीच कळेनासे झालंय बरकां.... काल - परवा - सकाळी ज्यांच्या सोबत मोबाईल वर गप्पागोष्टी झाल्या, ती व्यक्ती आज - संध्याकाळी नाहीत, साधा विश्वास सुद्धा बसत नाही.... अगदी सगळं एखादं रात्रीचे स्वप्न आहे की काय असं वाटतं.
मी नकळत व्हाट्सअप - फेसबुक उघडतोय, सध्या फार कमी मोबाईलला हात लावतो. व्हाट्सअप डीपी / स्टेटस, फेसबुक पोस्ट बघणे फार आवडायचं. पण आता इच्छा होत नाही. कारण... कारण तसचं आहे, त्या डीपी मधले हसरा चेहरा... किती जिवंत ! न कळत त्या फोटो वरून नजर हटेना, पुन्हा पुन्हा न बघिल्यासारखे तिरकी नजर जातेच. ते उघडून पाहिले की त्यातले मॅसेज - विनोद - विडिओ, कालच टाकले होते, उद्या नक्की भेटू-खुप दिवस झाले भेटलो नाही म्हणून टाकलेला एक मॅसेज.... हे वाचून डोळ्यांत पाणी येतं...
अशीच एक माझ्या स्वप्नीलची कहाणी...
स्वप्नीलला कोरोनाची लागण झाली, जेव्हा कोविड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेंव्हा पहिला मलाच कॉल केला. म्हणाला मित्रा, येतोय का...? मी म्हणालो कुठे रे, काय संचारबंदी मध्ये पिकनिक ला जायचा प्लॅन आहे की काय मित्रा...? तो म्हणाला हो १४ दिवसाचा प्लॅन आहे, मी समजतो नक्कीच स्वप्नीलला कोरोना लागण झाली असणार. मी म्हणालो, थांब माझा टेस्ट रिपोर्ट नाही आला, पॉझिटिव्ह आला की तुझ्याच जवळ चिटकून बेड घेणार... आणि दोघे हसत सुटलो... स्वप्नील जेव्हा कोविड सेंटर मध्ये जाणार होता त्याच्या ५ मिनिट आधी मी गेट जवळ हजर होतो.
अगदी माझा जवळचा मित्र. कोणतीही गोष्ट असू पाहिलं मलाच शेअर करणारा... माझा एकुलता एक जिवलग मित्र. बघता-बघता कसा चांगला होऊन निघून गेला घरी, या दुसऱ्या लाटेत. खुप आनंद झाला. तसा घरात सर्वांचा लाडका, मित्र-परिवरामध्ये दिलदार माणूस.
तो जेंव्हा कोविड सेंटर ला होता तेंव्हा संध्याकाळीच त्याचा मॅसेज आला होता, म्हणाला अरे मित्रा करमत नाही, खूपच एकटे एकटे वाटत आहे. माझ्या शेजारचा तरुण मुलगा सकाळीच देवाघरी गेला, आणि समोरच्या काकांची कंडिशन खुप बेक्कार आहे. काहींना तर बॉडी किट मध्ये बांधून ठेवले आहे. मी म्हणालो, नको काळजी करू, तुला काही त्रास तर होत नाही ना आता? ट्रिटमेंट चांगली घे, वेळेवर गोळ्या घेत जा. लवकर बरा हो मग आपण मस्त पार्टी करूयात आणि बॅड न्युज म्हणजे माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोघे पण खळ-खळून हसलो. अधून-मधून मी त्याला डब्बा द्यायला जायचो, पण भेट नाही फक्त लांबून (१००-१५०मीटर) एकमेकांना हात करायचो, कारण आत मध्ये जायला देत नसत. बाहेर डब्याच्या पिशवी वर नाव लिहून टेबलावर डब्बा ठेवायचा होता. रोज रात्री जेवण झाल्यावर आम्ही कॉल / मॅसेज वर बोलायचो, त्याला मी नेहमी आपल्या शाळेतल्या / कॉलेजच्या जुन्या आठवणी करून द्यायचो, कारण काही गोड आठवणी असतात त्या आठवल्या की माणूस अगदी फ्रेश होतो. त्याचे विचार कसे पॉझिटिव्ह होतील या कडे माझा जास्त कल होता, कारण आजूबाजूचे जे दृश्य असतं, ते पाहून माणूस नाही ते विचार डोक्यात आणतो.
नकळत हे दिवस निघून गेले, अगदी ठणठणीत बरा होऊन घरी आला. स्वागत इतके जबरदस्त की जसा हा आमदार निवडून आला आहे....
काही इतके विचित्र लोकं असतात की एखादा हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो आता पुन्हा बाहेर येणारच नाही (थोडक्यात याचा शेवटचा टप्पा आहे) असा विचार करून त्याला निगेटीव्ह विचाराकडे ढकलून देतात. त्याचा परिणाम ते विचित्र ऎकून / पाहून माणूस आतल्याआत मारून जातो. आणि मग............
तिकडून आवाज येतो, "तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे."
टिप्पण्या