एका जिवलग आत्म्याची गोष्ट

हि गोष्ट आहे एका गरीब चिकुवाल्याची
जुन्नरच्या लहानश्या गावात नवरा बायको म्हणजे किरण आणि सिमा राहत असतात. तसा किरण एक साधारण माणूस होता, पण त्या कडे एक छोटीशी जमीन होती. त्यात त्याने आपल्यासाठी एक घर आणि घरच्या मागे बऱ्याच वर्षांपूर्वी चिकुची बाग लावली होती.
किरण : बघ सिमा झाडं तर मोठी झाली आहेत.
सिमा : हो, पण अजून झाडाला चिकू का आले नाहीत?
किरण : इतके वर्ष झाडांची देखरेख केली आहे अजून काही महिने बघू, झाडांना भरपूर पाणी द्यावे लागेल आणि चिकू पण लवकर येतील.
सिमा: आशा करते लवकर येतील.
किरण आणि सीमा रोज त्या झाडांची जास्त काळजी घ्यायला लागले. रोज सकाळी सर्व झाडांना पाणी घातल्यावरच किरण आपल्या नोकरीवर जायचा.
जवळील एका हॉटेल वर मॅनेजर म्हणून काम करत असे. आज तू रोजच्या सारखा उशीर आलास किरण (त्याचा मालक त्याला बोलला) किरण : माफ करा मालक पुन्हा असा उशिरा नाही येणार, खरेतर मी लावलेल्या चिकूच्या बागेतल्या एका झाडाला किड लागली होती, मी औषधांची फवारणी करत होतो.
मालक म्हणाला, ठिक आहे पण तू इतके वर्ष झाडांची निगा राखली आहेस, आलेत का नाही काही पीक ? किरण म्हणाला, येणार मालक नक्की येणार.
त्याच दिवशी संध्याकाळी किरण ला त्याचा पगार मिळाला दहा हजार रुपये. तो सर्व पैसे घेऊन बाजूच्या दुकानात गेला, हे घ्या भाऊ तुमचे ५०० रुपये जे मी मागच्या महिन्यात घेतले होते. खुप खुप आभार म्हणत तो किराणा दुकानात गेला. नमस्कार सागर, मागच्या महिन्याची उधारी आणि आत्ताचे किराणा मिळून किती झाले ? (किरण ने दुकानदार सागर ला विचारले) सागर म्हणाला, २०४० रुपये. हे घ्या तुमचे सर्व पैसे. सागरचे आभार मानून किरण दुधल्याच्या घरी गेला. हे घ्या भाऊ तुमचे १००० रुपये, आता जुना हिशोब संपला आता नवीन चालू.
सर्वांचे पैसे देऊन किरण जेव्हा घरी पोहचला, सिमा: तुमचीच वाट पाहत होते, पगार मिळाला वाटतं? येथे ठेवा सर्व रेशन, मी गरम गरम चहा आणते. चहा पिता-पीता किरण म्हणाला, पगार मिळाला आणि ३५४० रुपये देऊनही टाकले. सिमा: म्हणजे आता फक्त ६४६० रुपये राहिलेत? (सिमा हळू आवाजात बोलली). किरण म्हणाला, हो त्यातले ३००० रुपये मला शेतीसाठी लागतील. वीज, मोटर आणि खत, पाण्याचं बिल इत्यादींसाठी आणि ५०० माझा महिन्याचा खर्च व उरलेले पैसे तू ठेव. जे पाहिजे ते घे सामान घे आणि बाकीचे पैसे जपून ठेव. सिमा म्हणाली, ठिक आहे पण पुढच्या महिन्यात माझ्या भावाचं लग्न आहे मग नवीन साडी नको का मला? किरण हसत म्हणाला, त्याची काळजी करू नकोस, पैसे नाही उरले तरी लग्नापर्यंत तुझी साडी आपण उधारीवर घेऊ.
सर्व हिशोब झालेला, सकाळी जेव्हा किरण आपल्या चिकूच्या झाडांकडे गेला तेव्हा त्याला चिकू आलेले दिसले, तो खुप खुश झाला. घाई-घाईत सिमा ला घेऊन बागेत आला. बघ आपल्या इतक्या वर्षाचे फळ दिसत आहे. अजून दिड-दोन महिन्यात चांगले चिकू येतील. सिमा म्हणाली, हे आपल्या झाडांचे पहिले पीक असेल आणि अशा करते की खुप चांगले येतील.
किरण आणि सिमा उत्साहित होते, त्यांची अनेक वर्षांची मेहनत आता रंग दाखवत होते. त्यांनी अजून दोन महिने बागेची चांगली देखरेख करायला लागले, एकाही चिकुला किड लागली की ते लगेच काढून टाकत असे.
असे करत एक दिवस चिकू पिकायला लागल्याचे दिसले, त्यांनी एका जागी सर्व चिकू झाडांवरून काढून ठेवले. जवळून जाणारा एक फळांचा व्यापारी विशालने तो ढिग पाहिला व किरण ला म्हणाला काय किरण चिकू विकायचे काय ? किरण म्हणाला हो विशाल, जर चिकुला चांगला भाव मिळाला तर बरं होईल.
विशाल म्हणाला, काय कितीला देणार हे सर्व चिकू? किरण म्हणाला, तुम्ही द्याल तेवढे. विशाल ने एक चिकू खाऊन पाहिला, मस्त गोड आणि चवदार लागला. विशाल म्हणाला, हे बघ किरण मी या सर्व चिकुंचे एक लाख पन्नास हजार देईल.
किरण आणि सिमाला हे ऐकून धक्काच बसला, किरण म्हणाला, अहो विशाल कशाला गारीबाची टिंगल करता.
विशाल हसत म्हणाला अरे मित्रा तुझ्या सोबत कशाला टिंगल करू? खरं तेच सांगतोय. मी एक अर्धा तासात तुझ्याकडे येतो.
किरण आणि सिमा एकमेकांकडे पाहतच राहिले आणि विशाल एक टेम्पो आणि तीन लोकं सोबत घेऊन आला. टेम्पोमध्ये सर्व चिकू भरल्यावर किरण च्या हातात दिड लाख दिले आणि म्हणाला पुढच्या वर्षीपन मलाच विक. किरणचे डोळे पाणावले होते, कारण त्याने आयुष्यात इतके पैसे पहिल्यांदा पाहिले होते. सिमा ही खुप खुश झाली होती.
सर्व झाल्यावर किरण आणि सिमा घरी पोहचले. सिमा: एवढ्या पैशांचं आपण काय करणार? किरण हे बघ आपण ७५००० बँकेत एफडी ठेऊयात, ५०००० चे तुझ्यासाठी दागिने करूयात आणि २५००० पुढच्या वर्षासाठी जपून ठेऊयात. सिमा : पन्नास हजारचे दागिने ? सिमा चकित झाली. किरण : आयुष्यभरात मी तुला एक मंगळसूत्राशिवाय दिलेच काय आहे? चल आत्ताच सोनाराच्या दुकानात जाऊयात.
ते दोघे दागिने घ्यायला सोनाराच्या दुकानात जातात. दुकानदार किरण ला बघून म्हणाला हे बघ किरण या वेळेस उधार काही मिळणार नाही. किरण : उधार घेण्यासाठी नाही आलो जितके होतील तितके रोख देईल. सोनाराला वाटले काय घेऊन घेऊन चार - पाच हजारांचे घेतील. (असं बोलून सोनार मनातल्या-मनात हसला) मग काय दाखवू ? किरण : तुम्ही एक कानातली कुड्या आणि एक नेकलेस दाखवा.
सिमाला पसंद पडलेले कानातले कुड्या आणि नेकलेस घेतले. किरण सोनाराला म्हणाला काय किती झाले यांचे ? सोनार म्हणाला परवडणार नाही तुला, ४६ हजार झालेत. किरण म्हणाला, अजून ४००० चे पायाचे चांदीचे पैंजण येईल ते पण दाखवा. सोनार म्हणाला अरे किरण मग सर्व मिळून ५०००० होतील, तुला परवडेल का इतके? किरण म्हणाला, त्याची काळजी करू नका. पैंजण पसंत झालं की पावती करा. झालं, सर्व पसंत करून. पावती द्या आणि हे घ्या पन्नास हजार रुपये.
सोनार हा किरण कडे इतके पैसे पाहून चकित झाला, त्याने किरण ला विचारले काय किरण कुठे खजिना सापडला की काय भावा ? किरण म्हणाला, हो असेच काही समजा. ते बोलून दोघे नवरा-बायको घरी गेले.
इकडे सोनाराने सर्व दुकानदारांना सांगून मोकळा झाला की किरणला खजिना भेटला आहे. हि बाब सर्व गावात वाऱ्यासारखी पसरली. शेवटी सर्व दुकानदार आणि सोनार गावाच्या सरपंचांना भेटून ही गोष्ट सांगितली. सरपंच सहित सर्व किरण च्या घरी गेले.
किरण सर्वांना पाहून घाबरला, म्हणाला काय झालं सरपंच? असे एकदम आणि सर्व लोकं माझ्याघरी ?
सरपंच म्हणाले, हो तुला जो खजिना भेटला आहे त्याचा हिस्सा आपल्या गावातल्या प्रत्येकाला द्यायला हवा.
किरण म्हणाला, अहो सरपंच कसला खजिना? माझ्या चिकूच्या बागेतील सर्व चिकू मी विशाल फळवाल्याला विकले आहेत, खोटं वाटत असेल तर चला आत्ताच विशाल कडे जाऊ.
सर्व विशाल फळवाल्याकडे जातात. सरपंच हे विशाल ला विचारतात काय रे तूच विकत घेतले का किरण कडून चिकू? विशाल म्हणाला हो, पण काय झालं? सरपंच म्हणाले, आम्हांला वाटले की किरण ला खजिना सापडला की काय.
हे सर्व ऐकल्यावर विशाल म्हणाला, थु... थु.... थू.... किती नीच दर्जाचे आहेत सर्व, सरपंच तुम्ही पण यात सहभागी झालात? या बिचाऱ्याने इकते वर्ष आपल्या चिकूच्या झाडांवर मेहनत केली, ते तुम्हाला दिसले नाही का ? ही त्याच्या मेहनतीचे कमाई आहे आणि तुम्ही लोकं याच्याकडे हिस्सा मागताय? असे बरेच काही बोलून सर्वांची मान खाली झाली.
सोनाराला खटकले की किरण कडे इतके पैसे आले कोठून? तर ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोकांना आपले भलं होताना देखवत नाही, फारच स्वार्थी होत चालली आहे ही दुनिया.......
टिप्पण्या