एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात"
जागतिक बँकेचे माझी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा.
भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा भक्कम असला तरीही वाढत्या विभाजक आणि ध्रुवीकरण या मुळे विकासाचा पाया खराब होत आहे. भारतात सध्या सर्वात मोठे आव्हान बेरोजगारी आहे. बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांनी पोहचला आहे, तो जगात सर्वात जास्त आहे. असे जागतिक बँकेचे माझी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी सांगितले.
कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नसून तो राष्ट्राच्या आर्थिक यशामध्ये जनतेचा विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारत देशात समाज विभाजन आणि ध्रुवीकरण वाढत आहे. हे फक्त खोदजनक नाही तर देशाच्या विकासाच्या पायालाह हानी पोहोचवत आहे, असे अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी म्हटले आहे.
बसू यांच्या मते, मोठा उद्योजक वर्ग, अधिक कुशल कामगार एकूण देशांतर्गत उत्पादन (जिडीपी) गुणोत्तरामध्ये जास्त गुंतवणूक यामुळे आपल्या भारताचा पाया मजबूत आहे. मात्र गेल्याकाही काळापासून कुशल कामगारांची संख्या कमी होत आहे. याचे नुकसान देशाला बसू शकतो.
भारतातील महागाईचे कारण जागतिक आहे. कोरोना महामारी आणि युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने महागाई वाढली आहे. हे भारताच्या नियंत्रणात नसेल तरीही गरीब आणि मध्यमवर्गीयांना यापासून वाचण्यासाठी कोणतीही पुरेशी पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
"लहान व्यापारी, कामगार व शेतकरी यांना थेट मदत द्या"
देशात किरकोळ महागाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. आपण गेल्या २४ वर्षात महागाई वाढल्याचे पाहिले नाही. सध्या जे काही होत आहे ते १९९० च्या दशकाची आठवण करून देत आहे. त्यावेळी पूर्व आशियाई संकटाचा परिणाम भारतात होऊ लागला होता. महागाई आणखी वाढत जाणार असून, सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत. लहान व्यापारी, कामगार आणि शेतकरी यांना थेट आणि तातडीची मदत देण्याची गरज असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या