एका जिवलग आत्म्याची गोष्ट

जेनिफर नावाचा एक तरुण संस्थेत कामाला लागला. खरं तर सुरवातीलाच काही लोकांना जेनिफर हे नाव थोड विचित्र वाटलं, वेगळं नाव वाटलं.
पण याच वेगळ्या नावाच्या तरुणाने चमत्कार घडवला. तो म्हणजे असा की, जेनिफर सुरवातीला ज्या डिपार्टमेंटमध्ये कामाला गेला तिथे काही दिवसातच सर्वांना अस दिसलं की, या डिपार्टमेंटची क्षमता वाढली आहे. तिथली पेंडिंग कामं भराभरा संपत चालली होती. फक्त त्याच डिपार्टमेंटची नाही तर इतर असणाऱ्या विभागाचंही तसच व्हायला लागलं. त्या नंतर दर तीन महिन्यानंतर जेनिफरची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली.
ज्या ज्या विभागात जेनिफरची बदली करण्यात आली त्या त्या विभागात आश्चर्य दिसायला लागलं. तो विभाग क्षमते पेक्षा जास्त चागलं काम करायला लागला. त्या कंपनीच्या मुख्य प्रबंधकाला याच आश्चर्य वाटलं की, असं कसं घडलं....?
ज्या वेळेस त्यानी विचारणा केली असता, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की, जेनिफर ज्या ठिकाणी जातो तिथे त्याच्या सहकाऱ्यांना प्रचंड मोठे प्रेरणास्रोत बनतो. ज्या मॉल मध्ये त्याला काम मिळालं होते त्या मॉल मधून त्याला शहरातल्या त्याच कंपनीच्या दुसऱ्या मॉल मध्ये पाठवले गेले. तिथेही त्याच घटना घडल्या.
काही दिवसात त्यांच्या एचआर डिपार्टमेंटच्या लक्षात आलं, जेनिफर फक्त जाऊन लोकांना प्रेरणा देतोय. जेनिफरच्या कामाचं स्वरूप बदललं गेलं. जेनिफरला एक वेगळा दर्जा दिला गेला. जेनिफरची खासियत ही होती की, तो जिथे जायचा तिथे लोकांमध्ये शक्ती भरायचा, ऐनेर्जी भरायचा, कामाचं कौतुक करायचा, चुकले असेल तरी त्यात थोडी सुधारणा करू शकतो असं ठासून सांगायचा, हे काम फक्त आणि फक्त तूच करू शकतो अस सांगायचा. जेनिफरच्या बोलण्यात, काम करण्यात एक प्रकारची शक्ती सामावली होती.
नेतृत्वाचं काम हेच असतं, नेतृत्व जाऊन समोरच्यात शक्ती भरतं....
टिप्पण्या