एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

मंदिरातली माय (एका आजीची खरी गोष्ट)

 मंदिरातली माय (एक आजी)


रोज येता-जाता त्या मंदिराच्या बाजूला माझे लक्ष जायचे, एक आजी दिसायची. एकदा घरी जाताना डब्ब्यातील राहिलेली चपाती भाजी तिला दिली. माझ्याकडे पाहून धन्यवाद बाळा म्हणाली. मी सुद्धा स्मित हास्य करून घरी निघालो.

त्या टपरीच्या मागे एका चटईवर बसायची, रात्री तिथेच झोपायची. सकाळी सकाळी मंदिरात येणारे भक्त देव दर्शनासाठी येत, पण काय माहित? कोण मदत करत असेल कि नाही. तिथे बाहेर नारळ तर फोडायचे पण प्रसाद मात्र आजीला भेटायचा नाही. रात्रीचा राहिलेला भात व भाजी आणि सकाळी झालेल्या डब्ब्यातील थोडी भाजी चपाती आजीला जाताना देत असद.

न राहून मी आजीला विचारले, आजी तुझे गाव कोणते? आजीने दोन मिनिट काहीच उत्तर दिले नाही. नंतर म्हणाली बाळा, तुझ्या सारखाच माझा एकुलता एक लेक आहे..... त्याचे वडील कोरोनामध्ये देवाघरी गेले, सुनेचे ऐकून त्याने मला येथे सोडले. मी त्याला दोन वेळेस जेवणाला जड झाले होते.... माझी घरी जायची आता इच्छा नाही, तरी ही तो मला घ्यायला येणारच नाही....
हे ऐकून माझे मन भरून आले, एकच शब्द बाहेर पडला "अरे देवा ! असे कोणासोबत करू नकोस रे"

दुसऱ्यादिवशी जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो तर तिथे आजी नव्हती. मी आजूबाजूला चौकशी केली पण सर्वच हेच म्हणाले कि माहित नाही, दिसली नाही, कुठे गेली देवालाच माहित. कुठे गेली देवालाच माहित. कुठे गेली देवालाच माहित.......


तिच्या समोरून
तिचाच मुलगा गेला असेल.....
ओळखीचा वाटू नये म्हणून
इतरांप्रमाणे दोन चार रुपये दिले असेल....
सर्वांना हात जोडून आभार मानते,
तसेच त्याचेही तिने धन्यवाद मानले....
आपली ओळख न दाखवून,
आपल्या पोटच्या पोराचे मन राखले....
त्या नंतर मात्र,
तो कधीच त्या मंदिरात गेला नाही....
जिथे माय त्याची पोटासाठी भिक्षा मागते,
तिथे तो कधीच फिरकला नाही....
त्याची आई ती जागा सोडून निघून गेली होती....
मुलाची मान आपल्यामुळे खाली जाईल,
त्यामुळे एका जागी ती पुन्हा कधी थांबली नाही...
रडून रडून
तिने जाणून - बुजून अंधत्व स्वीकारले....
बघून त्याला हाक मारणे होईल,
त्यामुळे बघण्याचेच पर्याय मिटवून टाकले....

_____विशाल डोळस

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूपच हृदयस्पर्शी गोष्ट डोळे पाणावले ही कथा वाचून आईची महती सर्वानाच कळत नाही अशा मुलांन पेक्षा ती नसलेली चागली
Every one should respect their parents and Old people

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

Corporate Management System

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं