एका जिवलग आत्म्याची गोष्ट

कला
प्रतेक मानवाच्या अंगात एक ना एक कला असतेच...
काहींच्या अंगात इतक्या कला असतात की, त्याच्या कलेला कुठे तोड नसते...
अन् काहींच्या अंगात काहीच नसले की मनात मात्र भर - भरून कला असतात...
मग मनात कला कशी असेल..? हे प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेतलाच असणार...!
समोरचा कितीही गुण संपन्न असू, त्यात जो चुका काढतोच, ही त्याची एकमेव व आयुष्यभर पुरणारी मनात कला असते. या माणसांना कधीच कोणाचे चांगले देखवत नाही. अशी माणसे दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात माहिर असतात, याला "नयनकला" असेही म्हणतात.
हे आनुवंशिक नसले तरी अशी माणसे लहानपणी समजायला लागल्यापासून तसेच असतात, कदाचित त्यांच्या सकस बुद्धीने त्यांना तशी देणगी दिली असणार.
हे लोकं सुरवातीला आपल्या कुटुंबातही चुका काढत असतात, त्यात विजय झाले की बाहेरील लोकांच्या चुका शोधण्यात हुशार होतात... जसा - जसा अनुभव वाढतो तसा - तसा अजून वाव मिळतो...
उदरणार्थ: एकदा अनोळखी माणूस रस्त्याने चालत असेल तरी, तो कसा चालतो, चप्पल कोणती घालतो, कपडे कसे आहेत, चालताना हात पुढे - मागे होतात की स्तब्ध हात घेऊन चालतो, इतके बारीक लक्ष ठेऊन असतात.
आता याला कशी कला म्हणायची तर... समोरच्या चालण्यात दोष काढणे - कसं चालतंय? चप्पल बघ कशी आहे? कपडे तर ब्रँडेड आहेत बुवा, हे असं कसं चालतंय शांत हात ठेऊन... याला म्हणतात कला.
म्हणजे अश्या व्यक्तींना कधीच कोणाचे चांगले करता येत नाही ते सतत अश्या अनेक चुकांच्या विचारांनी गुंतलेले असतात.
साहजिक हे लोकं बोलण्यात चतुर असतात, समोरचा कितीही चांगले सांगत असला तरी त्यांचे कधी ऐकून न घेता आपल्याच मनातल्या कलांना वाव देतात. येत तर काहीच नसतं, समजत तर काहीच नसतं पण समजले असे समोरच्याला भासवत असतात. अन् मनातल्या मनात हासतही असतात... नंतर दुसऱ्याला त्या बद्दल नाही ते सांगत बसतात - चांगले तर कधी सांगणार नाहीच, याला म्हणतात "ओठभाषा".
अशी लोकं "श्रवणतज्ञ" म्हणजे, आपण म्हणतो ना की भिंतीला कान असतात.. ती हिच लोकं.
ही लोकं "वासतज्ञ" ही असतात, आज यानी कोणता परफ्यूम मारला आहे त्याचा ब्रँड देखील हे लोकं किंमती सहित सांगत असतात.
हया लोकांचे असेच मिळते - जुळते लोकं त्यांना मिळतात, मग तर सांगायलाच नको.... कलेला अजून जोर येतो. ही लोकं चांगल्या लोकांमध्ये एकमेकांत भांडणे लावण्यात (झुंज लावणे) प्रामाणिक असतात.
अश्या लोकांपासून आपण कितीही चार हात लांब थांबलो तरी ते चार पायाने आपल्या जवळ येतातच...
या वर उपाय व अजून बरेच काही... पुढील लेखात (भाग -२) सांगितला जाईल.
टिप्पण्या