एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

ऑफिस पॉलिटिक्समध्ये कसे जिंकाल Clarity | Character | Calmness | Competence चतुःसूत्री वापर कसा कराल :

ऑफिस पॉलिटिक्समध्ये कसे जिंकाल

Clarity | Character | Calmness | Competence



चतुःसूत्री वापर कसा कराल :-

तुमचं character, clarity, calmness आणि काम हे तुमचं शस्त्र आहे.

चला तर मग पाहू या वर उपाय :- 

मराठी ब्लॉगर

1. ऑफिस पॉलिटिक्स समजून घ्या - नाक मुरडू नका :-

याला टाळता येत नाही. प्रत्येक ठिकाणी हे असतंच - कारण माणसं जिथं असतात तिथं "Interests Clash" होतात. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही, तर प्रभाव आणि संबंधांची खेळी आहे.

- कोणाचा बॉसवर जास्त प्रभाव आहे?

- कोण कुणाला पाठीशी घालतो?

- कोण कुठल्या निर्णयामागे आहे?

-"Who Influences Whom" हे ओळखा.


2. इमोशनल इंटेलिजन्स वापरा:–

भावनांवर कंट्रोल ठेवा कोणीतरी तुमचं नाव घेऊन गॉसिप करतंय? लगेच रिऍक्ट होऊ नका. तुमच्यावर जळतात? शांत राहा, सतत पुरावे ठेवत रहा. कोणीतरी तुमचं काम स्वतःचं म्हणतंय? Documented रहा. राजकारणात भडकणारा हरतो - संयमी व्यक्ती चतुर ठरतो.


3. "Allies" बनवा :-

एकटं राहू नका ज्या लोकांवर विश्वास ठेवता येईल असे काही सहकारी ठेवा. सगळ्यांशी चांगलं वागा - Not Fake, But Fair. टीममधले छोटे छोटे Favor लक्षात ठेवा - पण त्यांचा वापर योग्य वेळेसच करा.

राजकारणात एकटेपणा म्हणजे संकट. नेटवर्क म्हणजे कवच.


4. कामामध्ये Perfection ठेवा - आवाजाआधी परिणाम बोलू द्या :-

- तुमचं काम इतरांपेक्षा चांगलं असेल, Consistently असेल, तर तुमचं वर्चस्व Natural होतं.

-पॉलिटिक्समधला सर्वोत्तम शस्त्र - "Undeniable Excellence."

- जेव्हा Performance बोलतं, तेव्हा अफवा शांत होतात.


5. पुरावे, ईमेल्स, Documentation ठेवत चला :-

-जो कुणी Blame खेळतो, त्याला Documentation घातक ठरतं.

-"I Told You Verbally" वर कधीच विसंबू नका.

-सर्व Communication शक्यतो लेखी ठेवा.


6. गॉसिपमध्ये सामील होऊ नका - पण alert राहा :-

- Gossip = Temporary Thrill + Permanent Trap

- कोण काय बोलतो हे लक्षात ठेवा, पण कोणाचं सोंग उघड पाडू नका.


7. स्वतःचं नैतिक आरसा स्वच्छ ठेवा :-

- तुमचं Conscience Clear असेल तर Guilt-free Confidence येतो.

-तुमच्यावर खोटे आरोप झाले तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील.


8. बॉस आणि वरच्या लेव्हलशी शहाणपणे संबंध ठेवा :-

- काम वेळेवर करा, Updates द्या, पण चमचागिरी करू नका....

- चांगलं काम स्वतः Highlight करा - Visibility Is Key....


9. आपली role clarity ठेवा -सगळ्यांत सामील होण्याची गरज नाही :-

- "Don't Fight Every Battle – Choose Your War"

- सगळ्यांच्या चुकांवर प्रतिक्रिया देत बसलात तर तुम्ही Distract होतात.


10. मन प्रसन्न ठेवा - आत्मविश्वास + मानसिक आरोग्य सांभाळा.

-ऑफिस पॉलिटिक्स ही लढाई आहे - पण इथे रोज लढायचं नसतं.

-Meditation, Journaling, Positive Mindset याने तुम्ही Strong राहता.


निष्कर्षः

पॉलिटिक्स टाळता येणार नाही, पण त्या खेळात स्वतःचं इमान राखूनही जिंकता येतं.

तुमचं character, clarity, calmness आणि काम हे तुमचं शस्त्र आहे.

.

.

.

VishalDolas

Marathi Blogger..........✍🏻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

एका जिवलग आत्म्याची गोष्ट