एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

 "एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट"

एक वर्षापूर्वी तोच रोड आणि तीच चहाची टपरी

भाग १ : त्या वेळेस झालेले आमचे संभाषण :

रस्त्याने जाताना एक मित्र भेटला.
म्हणाला खूप दिवसांनी भेटलास, मीही तेच म्हणालो....😉
चल बसू म्हटल्यावर, आम्ही टपरीवर चहा घेता-घेता सहज विचारले... मित्रा काय करतो? झालं का D.Ed - B.Ed.....?


तो म्हणाला, कसलं काय... अर्धवट राहिलं, पण सध्या दहावी आणि बारावी Classes चालू करायचा विचार करत आहे. थोडा staff ठेवून मोक्याच्या जागी भाड्याने करेल चालू.


मी म्हणालो, कल्पना चांगली आहे. तुझ्या डोक्यात तर आधीपासूनच हे स्वप्न होते... ते तू १०० टक्के करून दाखवणारच.... पण एक मात्र लक्षात ठेव... Staff ठेवताना आपल्याजवळचे नातलग ठेवू नकोस....


तो म्हणाला, का रे...? अरे...., उलट मी नातलगच स्टाफ पाहिले आहेत, कारण ते प्रामाणिक काम करतील, माझ्या class ची प्रगती करतील, शिवाय कामाचे पैसे ही कमवतील. आपल्याच माणसांचे घर भरेल, त्यांना रोजगार मिळेल आणि थोडे विश्वासू परके ही ठेवेल.


मी म्हणालो, तुझं सर्व मान्य आहे. पण नको रे.... एखादा परका माणूस परवडला पण नातेगोते धोक्यात आणतात. जर काय वेगळे व विचित्र प्रकार झालाच तर तुला त्यांना बोलता येणार आहे का ?


समजा, class मध्ये नवीन आलेल्या qualified staff ला तुझे नातलग सांभाळून घेतील का? एखाद्या नातलगाने पैशाचा घोळ केलाच, तर त्याला तू जेल ची हवा देशील का? कामावरून काढू शकशील का? कामात चुका झाल्या तर बोलू शकशील का? आणि बोललाच तर तो पुन्हा तसे करणार नाही याची काय गॅरंटी देणार....?


मित्र म्हणाला, हा हे तुझे अगदी बरोबर आहे पण काय आता, मी त्यांना direct नाही कसे बोलणार....?


मी म्हणालो, राग आला तरी चालेल.... नाहीच बोल. जर तुला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे तर नाही बोलायला शिक... Class तुझा आहे, स्वप्न तुझे आहे.... जर स्वप्न पाहिलेच आहे तर तोंडावर पाणी मारून ते सत्यात आणू दाखव आणि तुला जर प्रामाणिक, विश्वासू staff पाहिजे तर vacancy ads दे...

अरे भरपूर मिळतील.... बघ, या मित्रावर विश्वास ठेव, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... बाकी तुझी मर्जी... मित्र या नात्याने एक चांगले सांगितले आहे....
तो थोडा दबक्या आवाजात म्हणाला, हो नक्कीच मित्रा.


रस्त्याने जाताना तोच मित्र  दोन वर्षा नंतर भेटला

दोन वर्षापूर्वी तोच रोड आणि तीच चहाची टपरी
भाग २ : या वेळेस झालेले आमचे संभाषण :

म्हणाला खूप दिवसांनी भेटलास, मीही तेच म्हणालो....😉
चल बसू म्हटल्यावर, आम्ही टपरीवर चहा घेता-घेता सहज विचारले... मित्रा काय करतो? झालं का Class सुरू? कुठं पर्यंत आलास ? त्या नंतर काही contact झाला नाही, आज अचानक समोर आणि तोच रोड तीच चहाची टपरी........


मित्र म्हणाला, contact बंद नसून मी mobile number बदलून टाकलाय. तू सांगितल्या पासून तसेच केले. समोर जी 2 मजली ईमारत आहे ती भाड्याची नसून स्वतःची, त्यातच क्लास चालू आहेत. तू जे सांगितले अगदी तसेच केले, पण एक वर्ष माझ्या जवळचे नातलग ठेवून पाहिले, तुझ्या काळ्याजीभेने ते सत्यात आणले.. 😂
मग नातलग कामावरून काढून टाकून मी परके staff भरले.... बघ एका वर्षात किती प्रगती झाली ते स्वतःच्या डोळ्यांनी बघ.... 🤭


मी रागात म्हणालो..... 😡 अ....रे मग, मी तुझा मित्र, मला पण तू नातलगमधे गणले का? 🤔


तो म्हणाला नाही रे, तुला प्रत्यक्ष दाखवायचे होते... ते समोर बघ, तुझ्याच नावाचा क्लास आहे. 🙏🏻😀
"VISHAL CLASSES" 💝



By, Vishal Dolas.

(Marathi Blogger)

टिप्पण्या

निनावी म्हणाले…
खुप छान सर, अप्रतिम लेख.... पटलं बरका.... 👌🏻👌🏻👌🏻💝
निनावी म्हणाले…
अब जाके तीर निशाने पे लगा हैं
खुपच छान लेख ♥️

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार