पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

लेकी वाचवा (Save Girl Child)

इमेज
  राष्ट्रीय बालिका दिवस विशेष (National Girl Child Day) समजातील मुलगा - मुलगी हा भेद कमी करणं, प्रत्येक मुलीला समाजात तिचा सन्मान आणि हक्क मिळवा यासाठी प्रयत्न करणं, प्रत्येक मुलीला तिचे मानवी हक्क मिळणं, मुलींना त्यांचं आरोग्य, शिक्षण, सन्मान आणि पोषक वातावरण आणि आहार मिळवण्यासाठी आवश्यक घटकांचा गांभीर्याने विचार करणं, आत्मरक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जागृत करणं या उद्देशांसाठी देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. भारतामध्ये National Girl Child Day म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी २४ जानेवारी दिवशी साजरा केला जातो. केंद्र सरकारने २००८ पासून देशभरात मुलींचं अस्तित्त्व जपण्यासाठी आणि मुलीच्या जन्माबाबत समाजात सुरक्षित, आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी खास उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे. आज 21 व्या शतकामध्येही भारतात मुलीचा जन्म होणं ही गोष्ट अनेकांना नकोशी वाटते. देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म टाळण्यासाठी गर्भपात करण्यापासून ते अगदी नवजात चिमुकल्यांना बेवारस सोडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मुली वाचवा सरकारकडून 'बेटी बचाव बे...

हस्ताक्षर

इमेज
जागतिक हस्ताक्षर दिन विशेष! || नित्य लिहा पाच ओळी, खुलेलं अक्षराची कळी || २७ फेब्रुवारी हा दिवस आपण "मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करतो तसाच २३ जानेवारी "जागतिक हस्ताक्षर दिन". आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण ४८ मुळाक्षरे आहेत. या मूलक्षरांचा वापर करून आपली मराठी भाषा बनते. लोकसंख्येनुसार मराठी भाषा ही भारतातील ४थी आणि जगातील १५वी भाषा आहे. भारत हा लिपीप्रधान देश आहे. येथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या आणि लिहिल्या जातात. प्रत्येक लिपीचे सौंदर्य वेगवेगळे आहेत. दोन हाताक्षर प्रेमी जेंव्हा एकत्र येतात, तेंव्हा त्यांच्यात मैत्री होते. ते अक्षरमित्र बनतात. माझं ५वी पर्यंतचे हस्ताक्षर खूप विचित्र होते. माझे हस्ताक्षर पाहून घरचे बोलायचे काय मांजरीचा पाय कुत्र्याला आणि कुत्र्याचा पाय मांजरीला.... मला ही वाईट वाटायचं. दुसऱ्याचं सुंदर हाताक्षर पाहून माझ्या मनाला ही वाटायचं माझं पण हाताक्षर असेच सुंदर असावं. ५वीत असताना भालेराव गुरुजी आम्हाला चित्रकला शिकवायचे. त्यांना मी ही गोष्ट सांगितली, तसे ते खुप छान स्वभावाचे होते. नेहमी चांगल्यागोष्टी सांगत. ते म्हणाले दुकानातून एक रेखीव अक्षरा...

छत्री

इमेज
  पावसाळ्याचे दिवस, त्यात मुंबईच्या लोकल चा प्रवास म्हणजे सांगायलाच नको. डोंबिवली ते भायखळा प्रवास, नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला पोहचलो.  ऑफिस ला गेलो की पहिला चहा असायचा, मस्त वाटायचं कारण त्याची चव आज ही मला आठवते. चहा पीत असताना संगीता मॅडम म्हणाल्या सावकाश पी आज भरपूर कामं आहेत. मी ओळखून गेलो आज कॅश किंव्हा चेक साठी बाहेर पाठवणार. संगीता मॅडम छान होते म्हणजे त्याच्या कामाचे स्वरूप, एकमेकांना मदत करणे, काही चुकले की न रागावता समजावून सांगणे इत्यादी. मी चहा घेतला आणि मॅडम कडे गेलो, म्हणालो द्या पत्ता... कोणाचा चेक आहे? मॅडम म्हणाले हुशार झालास रे... तुला आधीच सर्व कळतं. मी म्हणालो हो मग माझ्या गुरूच्या मनातले ऐकायला नको का?  मॅडम म्हणाले, ठिक आहे ठीक आहे... कुर्लाला जावे लागेल आणि दुपारपर्यंत जेवण करून ऑफिस ला पुन्हा ये. उद्याच चेक टाकावा लागेल आणि डाटा पण अपडेत करायचा आहे. मी म्हणालो ठिक आहे असा गेलो आणि असा आलो. खरेतर पाऊस म्हटले की मला थोडं किचकट वाटायचं आणि लोकल चा प्रवास म्हणजे नकोसाच... पण ज्याला सवय झाली त्याला याचे काहीच वाटत नाही, बरोबर ना? कशीबशी लोकल पकडून कुर्ला...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25