एका जिवलग आत्म्याची गोष्ट

शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण
१९ नोव्हेंबर | दुपारी १२.३८ - सायं ४.१७
तुम्हाला माहीत आहे?
या पूर्वी ५८० वर्षांपूर्वी १८ फेब्रुवारी १४४० रोजी झाले होते, असं तज्ञ सांगतात.
खगोलशास्त्रज्ञानाच्या मते, हे शतकातील दीर्घकाळ चालणाऱ्या चांद्रग्रहनांपैकी एक आहे. या ग्रहणाचा कालावधी ३ तास २६ मिनिटे २३ सेकंद असेल, म्हणजेच २००१ ते २१०० मधील इतर कोणत्याही ग्रहणापेक्षा दीर्घकाळ चालणारं ग्रहण असेल. या दरम्यान ९७% चंद्र लाल रंगात दिसेल.
नासाच्या म्हणण्यानुसार, हे वर्षातील शेवटचा खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. फ्रॉस्ट मून ही आणखी एक खगोलीय घटना आहे. फ्रॉस्ट मून (Frost Moon) म्हणजे, शरद ऋतूतील शेवटची पौर्णिमा आहे.
हे ग्रहण दक्षिण अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक प्रदेशातून दिसणार आहे.
हवामानाने साथ दिली तर आपल्या भारतातून अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांमधून चंद्रग्रहण पाहता येईल.
चंद्रग्रहण आणि त्याचे धार्मिक महत्व
हे चंद्रग्रहण कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी होत असल्याने याचे धार्मिक महत्व मोठे असल्याचे ज्योतिषी सांगतात. हे आंशिक आणि उपछाया चंद्रग्रहण असल्याने त्याचा प्रभाव मर्यादित आहे. त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध ठरणार नाही.
खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ?
सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असे संबोधले जाते.
चंद्राचा फक्त काही पृष्ठभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते.
ही सावली किती मोठी आहे, तितका तिचा प्रभाव दिसून येतो. या वेळी चंद्राच्या इतर भागावर गडद लालसर किंव्हा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात.
चंद्रग्रहण |
टिप्पण्या