एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

आयुष्य ही एक शाळा

 आनंदी राहण्यासाठी काही टिप्स

तुमच्या जगण्यातील सुख व आनंद वाढवायचा असेल, तर त्यासाठी काही उपाय / टिप्स.

आनंदी आणि सुखी राहण्यासाठी त्यांची अंमलबजावणी आजपासून करा.

१) आरोग्य

भरपूर पाणी घ्या. सकाळी पोटभर नास्ता / न्याहारी करा. दुपारी कमी जेवण करा. संध्याकाळी अल्पसा आहार घ्या. उत्साह, ऊर्जा आणि दुसर्याविषयी सहानुभूती ठेऊन जगा. सकाळी उठल्यावर प्रार्थना करा. रोज किमान दहा मिनिटे शांत बसा. रात्री सात ते आठ तास झोप घ्या.

२) व्यक्तिमत्त्व

तुमच्या आयुष्याची दुसऱ्याशी तुलना करू नका. त्यांनी आयुष्यात काय भोगले आहे याची तुम्हाला कल्पना नसते. स्वतःला उगाचच गांभीर्याने घेऊ नका. स्वतःची अमूल्य शक्ती वायफट बडबड / गपशप मध्ये खर्च करू नका. जागे असताना स्वप्ने पाहा. कोणाचा मत्सर करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे असते. तुम्हाला जे काही हवे आहे ते आधीच तुमच्याकडे आहे. कोणाचा द्वेष करण्यात वेळ वाया घालवू नका. भूतकाळ विसरा म्हणजे तुम्हाला वर्तमानात आनंदाने जगता येईल.

लक्षात घ्या "आयुष्य ही एक शाळा आहे" आणि तुम्ही तिथे शिकायला आलेला आहात. समस्या हा त्या शाळेतील अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. गणिताच्या तासाप्रमाणे त्या येतात आणि जातात. पण, त्यातून तुम्ही काय धडा घेतला आणि काय शिकला हे महत्त्वाचे असते.

स्मितहास्य करा, खळखळून मनसोक्त हसा. वादात तुम्ही जिंकलेच पाहिजे असे नव्हे.

३) समाज

नेहमी कुटुंबाच्या संपर्कात राहा. कुटुंबाला वेळ द्या. रोज कोणासाठी तरी काहीतरी चांगले काम करा. प्रत्येकाला सगळ्या गोष्टींसाठी माफ करा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

Corporate Management System

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं