एका जिवलग आत्म्याची गोष्ट

Work Place Bad Habits - कामाच्या ठिकाणी वाईट सवयी
कामाच्या ठिकाणी या वाईट सवयी घातक ठरू शकतात. यामुळे ना तुमचं इंक्रिमेंट होईल ना प्रमोशन.....
तुम्हाला तुमच्या वर्कप्लेसवर प्रमोशन किंवा इंक्रिमेंट मिळवायची असेल तर तुमची वागणूक व तुमच्या वाईट सवयी बदलाव्या लागतील. त्या वाईट सवयी कोणत्या त्या जाणून घेऊया.
वाईट सवयी (Bad Habits) : कुठल्याही कामाच्या ठिकाणी तुमच्या स्किल्ससोबत तुमची वागणूक महत्त्वाची ठरते. तेव्हा तुमची वागणूक कशी आहे त्यावर तुमचं प्रमोशन आणि इंक्रिमेंट ठरू शकते. मात्र तुमच्या सर्व सवयी तुमच्या कामात आणि त्याचबरोबर तुमच्या करिअर सक्सेस मध्येही अडथळे आणू शकतात. अनेकदा असे होते की, तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीवदेखील नसते.
कामाची सुरुवात न करणे : करिअर एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की, जे कर्मचारी स्वतःवरून कामाची सुरुवात करत नाहीत, त्यांची नवं काही शिकण्याची इच्छा / उत्सुकता नसते, ते सारखे घड्याळात बघत असतात. एखादं काम १ तासाचे असेल तरी त्या कामाला दोन तास लावायचे. हे बॉसला अजिबात आवडत नाही. तेव्हा तुमची ही सवय प्रमोशनच्या वेळी तुमची फजिती करू शकते. जे लोक स्वतःच्या आयडिया बॉसकडे घेऊन जातात, काहीतरी नवं करण्याची उत्सुकता ठेवतात अश्यांनाच प्रमोशनसाठी प्राधान्य दिल्या जातात.
कायम उशीरा येणे आणि लवकर जाणे : काही लोकांना ऑफिसमध्ये उशीरा येऊन लवकर घरी जायला आवडतं. कामाचा जास्त व्याप असला की काही कारण सांगून हाफ डे घेणे. जर तुम्ही ऑफिसमध्ये तुमची हीच सवय कायम ठेवली तर तुमचं प्रमोशन आणि इंक्रिमेंट दोन्ही कठीण ठरेल.
ऑफीसमधे ॲक्टिव्ह नसणे : नुसतं ऑफीसमधे जाऊन तुम्ही तुमचं वेगळं व्यक्तिमत्व पटवून देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ऑफिसच्या मीटिंग आणि मध्ये आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे लागेल. याचा थेट प्रभाव तुमच्या इंक्रिमेटवर होईल.
प्रत्येक गोष्टीची तक्रार करणे :ऑफिसमध्ये बरेच लोक असे असतात जे लहान सहन गोष्टींची तक्रार करतात. याचं त्याला अन् त्याच याला सांगणे. एकमेकांबद्दल कुर-कुर करणे. तुमच्यातही ही सवय असेल तर लगेच बदला. लहान सहन गोष्टींवर तक्रार करणारे लोक कोणालाही आवडणार नाही. तुमची ही सवय तुमच्यातील नकारात्मकता दर्शवत असते.
टिप्पण्या