पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे

इमेज
  आज Social Media वरती आपण जेव्हा Page Scroll करतो, दोन Video नंतरचा प्रत्येक Video आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो, की बाबा केस कसे विंचरायचे, कपडे कसे घालायचे, Hotel मध्ये बसायचे कसं, जेवायचे कसं, उठायचं कसं..... आपल्या आई बाबा सोबत कसे बोलायचे, आपण ज्यांना जन्म दिलाय त्या मुलांबद्दल आपण कसे बोलायचं, कसं वागायचं.... तो त्यांचा  अनुभव झाला नाही का ... पण तो फक्त  त्यांचाच अनुभव झाला... आपला वेगळा असू शकतो एकाच प्रसंगतला दोन व्यक्तींचा अनुभव वेगळा असू शकतो की... जसं पाऊस पडायला लागला की एखाद्याला कविता करावीशी वाटते, एखाद्याला चिंता करावीशी वाटते, की बाबा छप्पर गळतय, करायचं काय त्याचं आपण... मला असं वाटते की   "दुसऱ्याच्या अनुभवाची शिदोरी ही आपल्या आयुष्याच्या प्रवासात कधी पर्यंत पुरणार ?... नाही का" हो, म्हणजे कधी पर्यंत पुरणार नाही का, आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे, पण आयुष्यात जगण्यासारखे खूप काही आहे, नाही का.....

RTE Admission 2023-24: "आरटीई" प्रवेशाची तिसरी फेरी या तारखेपासून

इमेज
  RTE Admission 2023-24: "आरटीई" प्रवेशाची तिसरी फेरी या तारखेपासून १३ हजाराहून अधिक जागा रिक्त "आरटीई" प्रवेशाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आत्तापर्यंत राज्यातील आरटीई २५% प्रवेशा अंतर्गत ७६ हजार २३३ मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अजूनही राज्यात RTE च्या १३ हजाराहून अधिक जागा रिक्त आहे, आरटीईच्या दुसऱ्या फेरीतील म्हणजेच प्रतीक्षा यादीतील (Waiting List) मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, त्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांवर इतर मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ अंतर्गत आरटीई लॉटरी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लॉटरीमध्ये निवड झालेल्या मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली होती. कागदपत्र पडताळणी करून ६४ हजार २०६ मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. तदनंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना रिक्त जागांवर प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील २५ हजार ८९२ मुलांना अनुक्रमे मेसेज पाठवण्यात आले असून, त्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी सुरू...

आदिवासी विकास विभागाने दिली उभारी.. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी

इमेज
आदिवासी विकास विभागाने दिली उभारी.. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शासकीय अनुदानित, विना अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा दिल्यावर योग्य मार्गदर्शनाअभावी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे त्यांचा या परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा कल वाढावा यासाठी इयत्ता ११वी व १२वी मध्ये शिकत असतानाचा या विद्यार्थ्यांकरीता अभियांत्रिकी, वैद्यकीय व विधी पदवी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटीस अभ्यासक्रम तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा तयारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आय. आय. टी. (IIT) मधील अभ्यासक्रमांना जास्तीस जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी (SSC) नंतर २ वर्ष कालावधीमध्ये नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25