एका जिवलग आत्म्याची गोष्ट

RTE Admission 2023-24: "आरटीई" प्रवेशाची तिसरी फेरी या तारखेपासून १३ हजाराहून अधिक जागा रिक्त
"आरटीई" प्रवेशाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आत्तापर्यंत राज्यातील आरटीई २५% प्रवेशा अंतर्गत ७६ हजार २३३ मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अजूनही राज्यात RTE च्या १३ हजाराहून अधिक जागा रिक्त आहे, आरटीईच्या दुसऱ्या फेरीतील म्हणजेच प्रतीक्षा यादीतील (Waiting List) मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, त्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांवर इतर मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.
आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ अंतर्गत आरटीई लॉटरी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार लॉटरीमध्ये निवड झालेल्या मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली होती. कागदपत्र पडताळणी करून ६४ हजार २०६ मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
तदनंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना रिक्त जागांवर प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील २५ हजार ८९२ मुलांना अनुक्रमे मेसेज पाठवण्यात आले असून, त्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी सुरू आहे. त्यांच्यासाठी दिनांक १९ जून २०२३ ही प्रवेशाची अंतिम मुदत आहे.
आरटीईच्या १३ हजाराहून अधिक जागा रिक्त:
RTE पोर्टल वरील आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार लॉटरी मध्ये निवड झालेले ६४ हजार २०६ आणि प्रतीक्षा यादीतील १२०२७ असे एकूण ७६ हजार २३३ मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. (दि. १८ ) रोजीच्या आकडेवारी नुसार १३ हजार ८६५ जागा रिक्त दिसून येत आहे. यासाठी अजून एक दिवस शिल्लक असल्याने किती प्रवेश निश्चित होतात ते पहावे लागेल, त्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील इतर मुलांना प्रवेशाची संधी मिळणार असण्याची शक्यता आहे.
***** या मध्ये बदल होऊ शकतो, कारण प्रवेश सुरु शेवटचा दिवसा पासून दोन दिवस आधी घेतला आहे. याची नोंद घ्यावी.****
"आरटीई" प्रवेशाची तिसरी फेरी या तारखेपासून:
आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत RTE साठी निवड झालेल्या लॉटरी च्या मूळ यादीतील मुलांना संधी देण्यात आली होती, त्यानंतर दुसरी फेरी अर्थात प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश घेण्याची संधी मिळालेली आहे. त्यासाठी दिनांक १९ जून २०२३ ही अंतिम मुदत आहे.
त्यानंतर जर RTE च्या जागा रिक्त राहिल्या तर प्रतीक्षा यादीतील (Waiting List) म्हणजेच RTE च्या तिसऱ्या फेरीतील इतर मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. म्हणजेच दिनांक १९ जून नंतर या मुलांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रत्येक अपडेट साठी RTE पोर्टल भेट द्यावी.
टिप्पण्या