एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे


 

आज Social Media वरती आपण जेव्हा Page Scroll करतो,

दोन Video नंतरचा प्रत्येक Video आपल्याला काहीतरी

शिकवण्याचा प्रयत्न करतो,

की बाबा केस कसे विंचरायचे, कपडे कसे घालायचे,

Hotel मध्ये बसायचे कसं, जेवायचे कसं, उठायचं कसं.....

आपल्या आई बाबा सोबत कसे बोलायचे, आपण ज्यांना जन्म दिलाय

त्या मुलांबद्दल आपण कसे बोलायचं, कसं वागायचं....


तो त्यांचा अनुभव झाला नाही का... पण तो फक्त  त्यांचाच अनुभव झाला...

आपला वेगळा असू शकतो

एकाच प्रसंगतला दोन व्यक्तींचा अनुभव वेगळा असू शकतो की...

जसं पाऊस पडायला लागला की एखाद्याला कविता करावीशी वाटते,

एखाद्याला चिंता करावीशी वाटते, की बाबा छप्पर गळतय,

करायचं काय त्याचं आपण...

मला असं वाटते की 

"दुसऱ्याच्या अनुभवाची शिदोरी ही आपल्या आयुष्याच्या प्रवासात कधी पर्यंत पुरणार ?... नाही का"

हो, म्हणजे कधी पर्यंत पुरणार नाही का,

आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे,

पण आयुष्यात जगण्यासारखे खूप काही आहे, नाही का.....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Corporate Management System