एका जिवलग आत्म्याची गोष्ट

राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती!
5 सप्टेंबरपूर्वी सुरू होणार भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टल अखेर शिक्षक भरतीची तारीख ठरली, 5 सप्टेंबरपूर्वी शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडलं जाणार, पहिल्या टप्प्यात 23 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: 23 हजार शिक्षकांची भरती होईल. अनेक जिल्ह्यात ओपन आरक्षण शिल्लक राहिलं नव्हतं त्यामुळे त्याची चौकशी करून कुठल्या आरक्षणांतून कुठला शिक्षक घेतला याची खात्री करून आरक्षणात टाकलं जाणार असल्याचं शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.
राज्यातील शाळांमध्ये जवळपास 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त
राज्यात जवळपास 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत 50 टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करता येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. खासगी अनुदानित संस्थांना तसेच शाळांना रिक्तपदांची जाहिरात ‘पवित्र’वर प्रसिद्ध करावी लागणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
दिनांक 25 जुलै 2023 रोजी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना माननीय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती बाबत पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.
👉 पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रकाला पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात आली...
👉 15 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान पोर्टल वरती जाहिराती येतील.
👉 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होईल.
👉 10 ऑक्टोंबर रोजी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
👉 11 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोंबर दरम्यान नेमणुका देण्यात येतील.
👉 21 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान जिल्हा स्तरावर उमेदवाराचे कॉन्सलिंग करण्यात येईल.
या लिंक मध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येईल.
http://mahateacherrecruitment.org.in
उमेदवारांना त्यांचे स्व-प्रमाणपत्र (Self Certificaiton) करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी TAIT चाचणी नोंदणी क्रमांक (Registration Number), बैठक क्रमांक (Roll Number), नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत असणे आवश्यक आहे.
नवीन update आल्यावर याच ब्लॉग (लेख) मध्ये add केले जाईल.
टिप्पण्या