एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

नवऱ्याचा वेटर मित्र

नवऱ्याचा वेटर मित्र

बायको : अहो, चला ना दिड वर्ष झालं या लॉकडाऊन मुळे कुठे बाहेर जात आले नाही. ना कुठे मॉल, ना शॉपिंग, ना हॉटेल... पार वैताग आला घरीच बसून. काय चालू काय बंद करता करता पुन्हा सर्वच बंद झालं तर घर जेल सारखे वाटतं.


अगं मग चिडतेस कशाला, जाऊ की संध्याकाळी. हो पण कुठे.... हो.....? एक काम करू, तुला संध्याकाळचा किचनला आराम म्हणून जवळच्या हॉटेल मध्ये जाऊ.

वाह....! वाह....! अगदी माझ्या मनातले बोललात. छान... मग चालेल, खुप छान वाटेल.

असे बोलून मी आपल्या ऑफीसच्या कामात घरच्या-घरी मग्न झालो. सकाळचा चहा - बिस्कीट झाल्यावर दुपारी पण तेच होतं. कारण संध्याकाळी आपण बाहेर जाणार मग घरी जेवण कशाला बनवायचं, हे बायकोच्या डोक्यात.

संध्याकाळ झाली तेच बायकोची आवरा-आवर चालू झाली. एरव्ही ती दुपारी झोपत असते, पण आज ना झोप - ना घरचं जेवण बनवायचा त्रास, जाम खुश. मला म्हणाली अहो, आवरा लवकर उशीर होईल मग रात्री येता-येता. याचा अर्थ मी समजून गेलो की बायकोला हॉटेल मध्ये जायची घाई झाली आहे. मनातल्या मनात हसलो आणि मीही तयारी केली.

घरच्या जवळच एक हॉटेल होते. तिथे गेल्यावर गेट समोरच लोकांची मोठी रांग होती. आत जायला तर भीतीच वाटत होती, कारण कोरोनाच सावट अजून संपलेल नव्हतं. पण काय करणार बायकोचा हट्ट पूर्ण करावा लागतो.

अर्ध्या तासा नंतर कसाबसा एक टेबल रिकामा दिसला, तसाच आत पळत जाऊन टेबल पकडला. मनाला थोडं विचित्रही वाटलं पण पोटात कावळे कोकून कोकून आवाज बसला होता. लगेच बायको पण माझ्याच मागे पळत पळत टेबल वर.... बायकोचा चेहरा पाहिल्यावर वाटले जसे काय एखादा गड जिंकूनच आलो आहे. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसलो.


लगेच एक वेटर मेनू कार्ड घेऊन आला. मला म्हणाला, साहेब... मेनू कार्ड. बायको म्हणाली, या हॉटेल मधले स्पेशल कोणते कोणते डिश आहेत ?

वेटर म्हणाला, व्हेज मराठा स्पेशल थाळी - कोल्हापुरी पंधरा तांबडा रस्सा आणि मटण दम बिर्याणी आहेत. मी मेनू कार्ड चाळत असताना मला वेटरचा आवाज ओळखीचा वाटला. मी वर मान करून वेटरकडे पाहिले, तोच चक्क माझ्या लहानपणी शाळेतला मित्रा अमोल... त्याने ही मला ओळखले होते.


बायको म्हणाली, अहो काय घेणार? मी म्हणालो तूच सांग मी जरा बाहेर जाऊन फोन करून आलो. तसाच घाई - घाई उठून मी हॉटेलच्या बाहेर आलो आणि मॅनेजर ला सांगून अमोल ला बाहेर बोलावले. 

अमोल आला, म्हणाला काय मित्रा खुप वर्षातून भेटलास.... कसा आहेस ?

मी म्हणालो, अरे मित्रा तुझा नंबर बंद, मी खूप वेळ फोन लावायचा प्रयत्न केला. अमोल म्हणाला, अरे हो... नंबर दुसरा आहे माझा, तो हरवला आहे. बरं झालं तुला पाहून / भेटून छान वाटलं. मी म्हणालो, अरे तू येथे कसे काय?


अमोल म्हणाला, अरे लॉकडाऊन मुळे नोकरी गेली. कंपनी बंद, म्हटले घर कसे चालवायचे म्हणून हे काम लवकर भेटले. वहिनीला वेगळे वाटेल म्हणून मी तुला त्यांच्या समोर ओळख दाखवली नाही, माफ कर मित्रा. मलाही थोडं लाजल्या सारखे झालं. मी म्हणालो, मला टेबल बदलून दे. अमोल म्हणाला, अरे मित्रा कशाला ? मला या कामाची लाज नाही, करतोय ते माझ्या आणि माझ्या घरच्या पोटासाठी.

तू आत चल तुला एकसोएक स्पेशल जेवण देतो. मी म्हणालो, आपण आज सोबत जेवण करू, मी तुझ्या मॅनेजर सोबत बोलून घेतो. अमोल म्हणाला, अरे नको रे... तू तुझ्या बायको सोबत आला आहेस, त्यांच्या आनंदात मी सहभागी नाही होऊ शकत. तू माझी काळजी करू नकोस, तू आत चल पोट भर जेवण कर, माझी ड्युटी रात्री बारा नंतर संपते तेव्हा हॉटेल कडून मला पोट भर जेवण असत आणि थोडं घरी घेऊन जातो. हे ऐकून न कळत डोळ्यात पाणी आले, पण काय करणार बिचारा अमोल... 

खरच, मजबुरी खूपच वाईट असते.... मजबुरी खूपच वाईट असते....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

Corporate Management System

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

कधी कधी असं का होतं

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट