एका जिवलग आत्म्याची गोष्ट

खुर्ची वरून माणसाची किंमत ठरवली जाते
![]() |
खुर्ची |
खुर्ची वरून माणसाची किंमत ठरवली जाते आणि खुर्चीवर बसणार समोरच्याला किती किंमत देतो हे त्या वरून तो किती प्रामाणिक आहे हे समजले जाते.
एकदा प्रामाणिक काम करत असेल अन् त्याच्या छोट्या छोट्या चुका काढत असतील तर त्या प्रामाणिक काम करणाऱ्यांची कोणतेही काम करण्याची इच्छा होईल का.....?
काहींना हुशारी दाखवायची खुप सवयच असते, आपणच भारी... बाकी दुनिया वेडी... असे त्याला वाटत असते.
कसयं, मिळालेल्या पदाचा वापर चांगला केला तरच समोरचा टिकतो, नाहीतर एक क्षणभर तिथे थांबायची इच्छा होत नाही...
माणसाचा मशीन म्हणून उपयोग केला की मशीन एक ना एक दिवस बिघडतेच... म्हणून म्हणतो, माणुसकी जपा चला नाहीतर एक दिवस जवळून जातील पण कोण विचारणार नाही...
सर्वच ऐकून घेणारे नसतात, हे लोकं वेळ आल्यावर त्याची जागा नक्की कुठे आहे हे दाखवल्या शिवाय राहत नाही....
___मराठी लेख
विशाल डोळस
टिप्पण्या