पोस्ट्स

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

कधी कधी असं का होतं

इमेज
सुवर्णा ची अपूर्ण कहाणी खरे तर अपूर्ण कहाणी माझीच आहे. कधी वाटलं सुद्धा नव्हतं की असा एक क्षण पुन्हा माझ्या जीवनात येईल. "कधी कधी असं का होतं" , नियतीचा खेळ की नशिबाचा दोष? पण जे काही होत होतं ते चांगल्या की वाईटासाठी काहीच समजत नव्हतं..... वडील सरकारी नोकर असल्यामुळे त्यांची सतत बदली होत होती, या गावातून त्या गावात. त्यामुळे माझी शाळा हि बदलत जायची. नववी पास झालो, आता दहावी चे वर्ष..... म्हणजे मनात भीतीचे वातावरण, म्हणून वडिलांनी एप्रिल - मे मध्ये इंग्लिश आणि गणिताचा क्लास लावला. कारण कि माझे हेच दोन विषय कच्चे असायचे. नवीन गाव म्हटले कि सर्वच नवीन. नवीन लोक, नवीन जागा असं मन गुटमटायचे. त्या गावाच्या बस स्थानकापासून ते माझे घर चालत १० ते १२ मिनिट लागायचे. क्लास सुद्धा ५ मिनिट अंतरावर होते. त्या वेळेस माझ्याकडे सायकल होती, म्ह्णून २ मिनिट मध्ये क्लास मध्ये जायचो. हळू हळू थोडे मित्र झाले. शाळा कोणती चांगली, कोठे ऍडमिशन भेटेल वैगेरे वैगेरे माहित झाले. क्लास संपला कि सायकलवर गावात फेरफटका मारायचो. दुकान, हॉटेल, बाजार सर्व पाहायचो आणि जिकडे राहायला होतो तिचे आजूबाजूला शेती असायच...

लेकी वाचवा (Save Girl Child)

इमेज
  राष्ट्रीय बालिका दिवस विशेष (National Girl Child Day) समजातील मुलगा - मुलगी हा भेद कमी करणं, प्रत्येक मुलीला समाजात तिचा सन्मान आणि हक्क मिळवा यासाठी प्रयत्न करणं, प्रत्येक मुलीला तिचे मानवी हक्क मिळणं, मुलींना त्यांचं आरोग्य, शिक्षण, सन्मान आणि पोषक वातावरण आणि आहार मिळवण्यासाठी आवश्यक घटकांचा गांभीर्याने विचार करणं, आत्मरक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जागृत करणं या उद्देशांसाठी देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. भारतामध्ये National Girl Child Day म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी २४ जानेवारी दिवशी साजरा केला जातो. केंद्र सरकारने २००८ पासून देशभरात मुलींचं अस्तित्त्व जपण्यासाठी आणि मुलीच्या जन्माबाबत समाजात सुरक्षित, आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी खास उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे. आज 21 व्या शतकामध्येही भारतात मुलीचा जन्म होणं ही गोष्ट अनेकांना नकोशी वाटते. देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म टाळण्यासाठी गर्भपात करण्यापासून ते अगदी नवजात चिमुकल्यांना बेवारस सोडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मुली वाचवा सरकारकडून 'बेटी बचाव बे...

हस्ताक्षर

इमेज
जागतिक हस्ताक्षर दिन विशेष! || नित्य लिहा पाच ओळी, खुलेलं अक्षराची कळी || २७ फेब्रुवारी हा दिवस आपण "मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करतो तसाच २३ जानेवारी "जागतिक हस्ताक्षर दिन". आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण ४८ मुळाक्षरे आहेत. या मूलक्षरांचा वापर करून आपली मराठी भाषा बनते. लोकसंख्येनुसार मराठी भाषा ही भारतातील ४थी आणि जगातील १५वी भाषा आहे. भारत हा लिपीप्रधान देश आहे. येथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या आणि लिहिल्या जातात. प्रत्येक लिपीचे सौंदर्य वेगवेगळे आहेत. दोन हाताक्षर प्रेमी जेंव्हा एकत्र येतात, तेंव्हा त्यांच्यात मैत्री होते. ते अक्षरमित्र बनतात. माझं ५वी पर्यंतचे हस्ताक्षर खूप विचित्र होते. माझे हस्ताक्षर पाहून घरचे बोलायचे काय मांजरीचा पाय कुत्र्याला आणि कुत्र्याचा पाय मांजरीला.... मला ही वाईट वाटायचं. दुसऱ्याचं सुंदर हाताक्षर पाहून माझ्या मनाला ही वाटायचं माझं पण हाताक्षर असेच सुंदर असावं. ५वीत असताना भालेराव गुरुजी आम्हाला चित्रकला शिकवायचे. त्यांना मी ही गोष्ट सांगितली, तसे ते खुप छान स्वभावाचे होते. नेहमी चांगल्यागोष्टी सांगत. ते म्हणाले दुकानातून एक रेखीव अक्षरा...

छत्री

इमेज
  पावसाळ्याचे दिवस, त्यात मुंबईच्या लोकल चा प्रवास म्हणजे सांगायलाच नको. डोंबिवली ते भायखळा प्रवास, नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला पोहचलो.  ऑफिस ला गेलो की पहिला चहा असायचा, मस्त वाटायचं कारण त्याची चव आज ही मला आठवते. चहा पीत असताना संगीता मॅडम म्हणाल्या सावकाश पी आज भरपूर कामं आहेत. मी ओळखून गेलो आज कॅश किंव्हा चेक साठी बाहेर पाठवणार. संगीता मॅडम छान होते म्हणजे त्याच्या कामाचे स्वरूप, एकमेकांना मदत करणे, काही चुकले की न रागावता समजावून सांगणे इत्यादी. मी चहा घेतला आणि मॅडम कडे गेलो, म्हणालो द्या पत्ता... कोणाचा चेक आहे? मॅडम म्हणाले हुशार झालास रे... तुला आधीच सर्व कळतं. मी म्हणालो हो मग माझ्या गुरूच्या मनातले ऐकायला नको का?  मॅडम म्हणाले, ठिक आहे ठीक आहे... कुर्लाला जावे लागेल आणि दुपारपर्यंत जेवण करून ऑफिस ला पुन्हा ये. उद्याच चेक टाकावा लागेल आणि डाटा पण अपडेत करायचा आहे. मी म्हणालो ठिक आहे असा गेलो आणि असा आलो. खरेतर पाऊस म्हटले की मला थोडं किचकट वाटायचं आणि लोकल चा प्रवास म्हणजे नकोसाच... पण ज्याला सवय झाली त्याला याचे काहीच वाटत नाही, बरोबर ना? कशीबशी लोकल पकडून कुर्ला...

कसे वाचाल? Request Money Fraud फोन पे / गूगल पे फसवणूक

इमेज
फोन पे / गूगल पे फसवणूक   ( UPI Fraud:  Request Money ) गूगल पे, फोनपे, पेटीएम, बीएचआयएम ( BHIM UPI)  प्रकारच्या अ‍ॅप्सवर(Apps) दुसर्‍या व्यक्तीकडून पैशाची विनंती करण्याचा एक पर्याय आहे, ज्याचा फायदा फसवणूक करणार्‍यांनी घेतला आहे. असे म्हणा की आपण एखाद्या व्यक्तीस आपण विक्री करू इच्छित असलेल्या उत्पादनासाठी देयकाची अपेक्षा करीत आहात परंतु आपल्याला ती रक्कम देण्याऐवजी ती व्यक्ती त्या रकमेची देय विनंती पाठवते. हे फक्त इंटरनेट, न्यूज पेपर, न्यूज चॅनेल / Whatsapp वर पाहिले / ऎकले असणार. आज प्रत्येक्ष माझ्यासोबत हे झाले आहे. हे लोकं कसे फसवतात / काय बोलतात / किती वेळात समोरच्या  माणसाला वेडे करतात अथवा फसवतात हे थोडक्यात पाहू. आपले दैनंदिन जीवनात इतके Busy असतो कि काही घटना असे होतात कि ते लवकर लक्षात येत नाही. साधे गाडी चालवत असताना देखील जीवाची पर्वा न करता मोबाईल फोन चा वापर होतो, इतके आपण Busy असतो. खेळ फक्त २ सेकंद मध्ये होऊन जातो, जेंव्हा हा खेळ पूर्ण होतो तेंव्हा पचताव्याशिवाय आपल्याजवळ काही उरत नाही.  आपल्यापैकी बर्‍याचजण...

शाळेच्या गमती-जमती भाग १

इमेज
माझी  आवडती शाळा..... (Nirgude, Tal. Junnar, Dist. Pune) १९९४ ते १९९६-९७ छान वाटतं बोलवायला ना कि फक्त शाळा जरी म्हणते तरी आपले मन लगेच आपल्या बालपणात जातं. आपली शाळा आठवते. आपले जवळचे मित्र, जीव लावणारे शिक्षक आणि सर्वात महत्वाचे मार देणारे शिक्षकही आठवतात. "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" खरच ते खुप गोड दिवस असायचे. हे आत्ता समजायला लागलं, पुन्हा ते दिवस येणे नाही. शाळेत असताना मस्ती मौज-मजा खुप असायची. तेवढेच मस्करी-भांडणही असायचं. आपले शिक्षक आपल्याला सतत मारतात हे त्या वेळेस खुप वाईट वाटायचे, पण आत्ता समजले तो मार आपल्यासाठीच खुप महत्वाचा असायचा. शिक्षक विनाकारण कधीच मारत नसायचे. अपूर्ण गृहपाठ, पाढे पाठ नाही, शाळेची दांडी, शाळेत उशीरा येणे वैगरे कारणे असायचे आणि असे एक-एक किस्से असायचे की आत्ता आठवले तरी गालातल्या-गालात हसायला येत. आपल्या शाळेचा वर्ग म्हणजे सर्वात पुढच्या बाकावर बसलेले आपले मित्र म्हणजे सर्वात हुशार गणले जायचे. मध्यम भागात बसलेले ना हुशार ना ढ, आणि मागच्या बाकावर बसलेले काही विचारायला नकोच, त्यांची गणना मस्तीखोर-भांडखोर, "ढ" अशीच असायची....

सर्वात पहिली आरोळी

इमेज
आ म्हणजे आस्था, ई म्हणजे ईश्वर !! आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !! आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!! आई म्हणजे मंदिराचा कळस… आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !! आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!! आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!! आई म्हणजे वेदने नंतरची सर्वात पहिली आरोळी : आ ................ई..... आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे...

नैसर्गिक आणि कृत्रिम आंबा

इमेज
नैसर्गिक आणि कृत्रिम आंब्यातील फरक कसा ओळखावा... आंबा म्हणजे फळांचा राजा, त्याचा मधुर स्वाद, गोड चव, त्याच्या सुगंधाची दरवळ अनोखी असते . लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे आंबा. आपल्या देशातच नाही तर भारताचा आंबा विदेशात देखील लोकप्रिय आहे. आंबा म्हणजे त्यापासून विविध पदार्थ बनविल्या जातात, त्यात आंब्याचा रस, आंबा पोळी, आंबावडी इत्यादी अनेक पदार्थ आंब्यापासून बनविले जातात. परंतु सध्या आंब्याची नक्कल करुन कृत्रिम आंबे बनविले जातात. हे कृत्रिम आंबे दिसायला आंब्यांसारखेच दिसतात, पण कापून पाहिल्यावर चवीला मुळीच गोड नाही आणि या आंब्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतात.  पारंपारिक पध्दतीने गवताची आढी घालून ४-५ दिवस ठेवून पिकवण्याऐवजी कृत्रिम पद्धतीत ते काही तासात पिकवले जातात.  तुम्ही बाजारात गेल्यावर कसे ओळखाल आंबा नैसर्गिक आहे की कृत्रिम? चला जाणून घेऊया. १. रंग-  नैसर्गिक आंब्यापेक्षा कृत्रिम आंब्यावर हिरवट डाग असतात. हे डाग केशरी किंवा पिवळ्या रंगात मिसळत नाही म्हणून ते अधिक उठावदारपणे दिसून येतात. हे कृत्रिम आंबे नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा अधिक ...

अक्षय्य तृतीया

इमेज
अक्षय्य तृतीया भारतीय संस्कृतीतील महत्वाचा दिवस, साडे-तीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील १ दिवस आहे.   हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया   या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया  साडेतीन  मुहूर्तांपैकी १ शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत / उप वास करण्याचे महत्त्व सांगीतले आहे. जैन  धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.  या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी   अन्नपूर्णा (देवी)   जयंती,  नर-नारायण या जोडदेवाची  जयंती,  परशुराम   जयंती,  बसवेश्वर  जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत   ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. तीन मुहूर्तांपैकी एक असला तरी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25