एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

"इंद्रायणी नदी आणि मी"

"इंद्रायणी नदी आणि मी"

काल रविंद्र भट याची कादंबरी वाचत होतो, 
"इंद्रायणीकाठी" छान आहे, आवडली.

सारांश / संदर्भ
ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील ही कादंबरी आहे. रविंद्र भट यांच्या रसाळ आणि ओघवत्या भाषेतून झालेले हे लेखन एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या विश्वात विश्वाची चिंता करणारे लहानगे ज्ञानदेव आहेत आणि ज्ञानेश्वरी लिहून जगाला प्रकाश दाखविणारे प्रगल्भ अधिकारी ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वरांची सर्वच रूपे अंतर्मुख करणारी आहेत. ज्ञानेश्वरांवर आजवर अनेकांनी लिहले आहे. मात्र, ज्ञानेश्वरांचे पूर्ण रूप या कादंबरीतून जसे उलगडले आहे, तसे क्वचितच कोणी! ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील घटना, प्रसंगांच्या साखळीतून त्यांचे जीवनसंबंधीचे तत्वज्ञान समोर येते. तेव्हा याच ओळी ओठावर येतात, अगा ज्ञानदेवा प्राज्ञ भागवता, आशीर्वाद देई पामरास आता.

आज नेमकी रविवार, आणि आळंदीला जायचा बेत बायको चा झाला. आळंदी जवळ राहायला आहे कधी गेलो नाही आणि रोज कामावर जाण्यात वेळ जातो, कधीतरी फिरायला घेऊन जा, असा बायकोचे शब्द कानावर पडले.
मग काय जावे तर लागणारच शेवटी बायकोचा हट्ट ना !

इंद्रायणी नदी जवळ पार्किंग ला गाडी लावून इंद्रायणी नदीच्या काठी जायचे ठरले. मी काल वाचलेली रविंद्र भट याची कादंबरी आठवली.

आम्ही तिथे गेल्यावर नदीची अवस्था पाहून खूप वाईट वाटलं. काही लोकं आंघोळ करत होतो तर काही कपडे धुत होते, नदी मध्ये नाही ते पदार्थ / हार / फुलं / दिवे सोडत होते, हे तर काहीच नाही... अक्षरशः काही लोकं गाड्या ही धुत होते.

मी काही फोटो / व्हिडिओ काढले आहेत.








हे पाहून असं वाटलं की खरंच का कलयुग आलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट