पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

Work Place Bad Habits - कामाच्या ठिकाणी वाईट सवयी

इमेज
  Work Place Bad Habits - कामाच्या ठिकाणी वाईट सवयी कामाच्या ठिकाणी या वाईट सवयी घातक ठरू शकतात. यामुळे ना तुमचं इंक्रिमेंट होईल ना प्रमोशन..... तुम्हाला तुमच्या वर्कप्लेसवर प्रमोशन किंवा इंक्रिमेंट मिळवायची असेल तर तुमची वागणूक व तुमच्या वाईट सवयी बदलाव्या लागतील. त्या वाईट सवयी कोणत्या त्या जाणून घेऊया. वाईट सवयी (Bad Habits) : कुठल्याही कामाच्या ठिकाणी तुमच्या स्किल्ससोबत तुमची वागणूक महत्त्वाची ठरते. तेव्हा तुमची वागणूक कशी आहे त्यावर तुमचं प्रमोशन आणि इंक्रिमेंट ठरू शकते. मात्र तुमच्या सर्व सवयी तुमच्या कामात आणि त्याचबरोबर तुमच्या करिअर सक्सेस मध्येही अडथळे आणू शकतात. अनेकदा असे होते की, तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीवदेखील नसते. कामाची सुरुवात न करणे : करिअर एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की, जे कर्मचारी स्वतःवरून कामाची सुरुवात करत नाहीत, त्यांची नवं काही शिकण्याची इच्छा / उत्सुकता नसते, ते सारखे घड्याळात बघत असतात. एखादं काम १ तासाचे असेल तरी त्या कामाला दोन तास लावायचे. हे बॉसला अजिबात आवडत नाही. तेव्हा तुमची ही सवय प्रमोशनच्या वेळी तुमची फजिती करू शकते. जे लोक स्वतःच्या आयडि...

पॉडकास्ट माहिती : म्हणजे काय, प्रकार, फायदे, पैसे कसे कमवावे?

इमेज
पॉडकास्ट माहिती : म्हणजे काय, प्रकार, फायदे, पैसे कसे कमवावे? (What Is Podcast Information In Marathi) पॉडकास्ट हा शब्द भारतात नुकताच लोकप्रिय होऊ लागला आहे. आजकाल कुठेतरी तुम्ही सर्वांनी पॉडकास्टचे नाव नक्कीच ऐकले असेल. परंतु आपल्या सर्वांनाच त्याबद्दल योग्यरित्या माहिती नसेल. याचा अर्थ असा नाही की या पॉडकास्ट प्रकारात वाव नाही. हा आपल्या सर्वांचा गैरसमज देखील असू शकतो. कारण परदेशातील लोक यूट्यूब आणि ऑनलाईन ब्लॉग वगळता पॉडकास्ट ऐकणे पसंत करतात. तुम्ही सर्वांनी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबमध्ये बरेच व्हिडिओ पाहिले असतील आणि कदाचित तुम्ही ते व्हिडिओ बनवले सुद्धा असतील. पण तुम्ही कधी ऑडिओ तयार किंवा रेकॉर्ड केला आहे का? आणि तुम्ही ते कुठेतरी अपलोड केले आहे का? जेव्हा तुम्ही सोशल मीडिया वर आलात, तुम्हाला जर तुमच्या कल्पना शेअर करायच्या आहेत, तर तुम्ही यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरता आणि तुमच्या कल्पना लोकांशी शेअर करता, तर तसेच हा पॉडकास्ट हा देखील सोशल मीडियाचा एक भाग आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती शेअर करू शकता. लोगोसह शेअर करू शकता. ते कसे करायचे? पॉडकास्ट चा अर्थ काय आहे, ...

कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ?

इमेज
कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ? ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये... "आधी थोड्याच समजून घेऊ नेमके काय असते ग्रहण" खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ? सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असे संबोधले जाते. चंद्राचा फक्त काही पृष्ठभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. ही सावली किती मोठी आहे, तितका तिचा प्रभाव दिसून येतो. या वेळी चंद्राच्या इतर भागावर गडद लालसर किंव्हा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात. देशातील पूर्वोत्तर राज्यात पूर्ण चंद्रग्रहण तर काही ठिकाणी खंडग्रास चंद्रग्रहण ( Chandra Grahan 2022)   बघायला मिळणार आहे. देशात सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा सूतककाळ ८ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांला सुरू होणार आहे. चंद्रग्रहणाचा काळ हा ९ तासांचा असणार आहे. भारतातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये कंकणाकृती चंद्रग्रहण दिसणार आहे. भारताशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पेसिफिकमध्ये देखील चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेता येईल. भारतात प्रमुख शहर...

सूर्यग्रहण - भारत

इमेज
 दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज २५ ऑक्टोबरला देशात आणि जगात सूर्यग्रहण होणार आहे. २०२२ सालातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2022 ) आहे. हे ग्रहण भारतातील काही शहरांमधून पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कारण, असे ग्रहण पुढील दशकभर भारतातून दिसणार नाही. देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे. ग्रहणकाळात भारतातील लोकांना फक्त ४३ टक्के मंद सूर्यच दिसणार आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सूर्य हा आपल्या कक्षेत फिरत असतो. मात्र, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. या खगोलीय स्थतीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या काही किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.अशा प्रकारचे सूर्यग्रहण भारतात २ ऑगस्ट २०२७ रोजी दिसणार आहे.भारतातील वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:२९ वाजता सुरू होणार आहे. हे...

प्रेरणादायी लीडर कसे बनाल

इमेज
जेनिफर नावाचा एक तरुण संस्थेत कामाला लागला. खरं तर सुरवातीलाच काही लोकांना जेनिफर हे नाव थोड विचित्र वाटलं, वेगळं नाव वाटलं. पण याच वेगळ्या नावाच्या तरुणाने चमत्कार घडवला. तो म्हणजे असा की, जेनिफर सुरवातीला ज्या डिपार्टमेंटमध्ये कामाला गेला तिथे काही दिवसातच सर्वांना अस दिसलं की, या डिपार्टमेंटची क्षमता वाढली आहे. तिथली पेंडिंग कामं भराभरा संपत चालली होती. फक्त त्याच डिपार्टमेंटची नाही तर इतर असणाऱ्या विभागाचंही तसच व्हायला लागलं. त्या नंतर दर तीन महिन्यानंतर जेनिफरची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. ज्या ज्या विभागात जेनिफरची बदली करण्यात आली त्या त्या विभागात आश्चर्य दिसायला लागलं. तो विभाग क्षमते पेक्षा जास्त चागलं काम करायला लागला. त्या कंपनीच्या मुख्य प्रबंधकाला याच आश्चर्य वाटलं की, असं कसं घडलं....? ज्या वेळेस त्यानी विचारणा केली असता, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की, जेनिफर ज्या ठिकाणी जातो तिथे त्याच्या सहकाऱ्यांना प्रचंड मोठे प्रेरणास्रोत बनतो. ज्या मॉल मध्ये त्याला काम मिळालं होते त्या मॉल मधून त्याला शहरातल्या त्याच कंपनीच्या दुसऱ्या मॉल मध्ये पाठवले गेले. तिथेही त्याच घटना...

मैत्री

इमेज
लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण त्यात एखादाच मित्र असतो. मित्र म्हणजे काय तर....  तहान लागल्यावर पाण्याची किंमत कळते, तशी गरज लागल्यावर मित्राची किंमत कळते... कामापूरता मामा (पुरे-पुर वापर करणारा मित्र) नेट प्रॉब्लेम आहे रे...उद्या देतो, काय पळून चाललोय काय? ए टी म ब्लॉक झालंय... पगार झाला नाही, काय सांगू आत्ताच गाडीचा हफ्ता दिलाय, पुढच्या महिन्यात पगार झाल्या-झाल्या तुलाच देणार... फक्त आठवण कर मित्रा... बस का भावा-विसरला का? काय हिरो-एकटा एकटा कुठे फिरतो, आम्हालाही बोलवायचं-आलो असतो की... वहिनी माहेरी गेली वाटतं, लई खुप दिसतोय असे जखमेवर मीठ चोळणार मित्र. अरे ती नाही म्हणाली म्हणून काय झालं? जगात ढिगानी पडलेत, ती काय इंद्राची परी आहे का, दुसरी शोधू असे समजून काढणार मित्र. स्टेटस भारी-भारी टाकतो, आपल्याच शाळेत होतास ना मित्रा. किंव्हा शेवटी मित्र कोणाचा... असे क्रेडिट स्वतः ओढून घेणार... कोण रे ती लाल ओढणीवली स्टेटस मध्ये? असे अनेक-अनेक न सुचणारे प्...

मा. द्रौपदी मुर्मू - देशाची एक आदिवासी कन्या राष्ट्रपती

इमेज
  भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून मा. द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्या... आदिवासी कुटुंबाचे अध्यक्षपदाचे उमेदवार एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशामध्ये आदिवासी कुटुंबात झाला. त्यांना रमा देवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर मा. द्रौपदी यांनी ओडिशाच्या राज्य सचिवालयातून नोकरीला सुरुवात केली. त्यांचं लग्न श्याम चरण मुर्मूशी झाले आहे. १९९७ मध्ये प्रथमच नगर पंचायतीची निवडणूक जिंकून त्या प्रथमच स्थानिक नगरसेवक झाल्या. तीन वर्षांनंतर त्या रायरंगपूरच्या त्याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या. ओडिशातील अत्यंत मागासलेल्या आणि संथाल समुदायातील ६४ वर्षीय द्रौपदी यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. आर्थिक अडचणींमुळे केवळ पदवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या द्रौपदी यांनी शिक्षणालाच आपले करिअर बनवले. याआधी त्यांनी ओडिशा सरकारमध्ये काम केले आहे. नंतर राजकारणासाठी भाजपची न...

आयुष्य ही एक शाळा

इमेज
  आनंदी राहण्यासाठी काही टिप्स तुमच्या जगण्यातील सुख व आनंद वाढवायचा असेल, तर त्यासाठी काही उपाय / टिप्स. आनंदी आणि सुखी राहण्यासाठी त्यांची अंमलबजावणी आजपासून करा. १) आरोग्य भरपूर पाणी घ्या. सकाळी पोटभर नास्ता / न्याहारी करा. दुपारी कमी जेवण करा. संध्याकाळी अल्पसा आहार घ्या. उत्साह, ऊर्जा आणि दुसर्याविषयी सहानुभूती ठेऊन जगा. सकाळी उठल्यावर प्रार्थना करा. रोज किमान दहा मिनिटे शांत बसा. रात्री सात ते आठ तास झोप घ्या. २) व्यक्तिमत्त्व तुमच्या आयुष्याची दुसऱ्याशी तुलना करू नका. त्यांनी आयुष्यात काय भोगले आहे याची तुम्हाला कल्पना नसते. स्वतःला उगाचच गांभीर्याने घेऊ नका. स्वतःची अमूल्य शक्ती वायफट बडबड / गपशप मध्ये खर्च करू नका. जागे असताना स्वप्ने पाहा. कोणाचा मत्सर करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे असते. तुम्हाला जे काही हवे आहे ते आधीच तुमच्याकडे आहे. कोणाचा द्वेष करण्यात वेळ वाया घालवू नका. भूतकाळ विसरा म्हणजे तुम्हाला वर्तमानात आनंदाने जगता येईल. लक्षात घ्या "आयुष्य ही एक शाळा आहे" आणि तुम्ही तिथे शिकायला आलेला आहात. समस्या हा त्या शाळेतील अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. गणिताच्य...

YouTube जाहिराती बंद करण्याची सोपी पद्धत

इमेज
YouTube Movie / Story / Cartoon / Food Videos etc बघताना तुम्हाला सारखी - सारखी जाहिरात (Ads) येत असेल तर.... YouTube जाहिराती बंद करण्याची सोपी पद्धत या पद्धतीमध्ये YouTube वरून जाहिराती काढून टाकण्यासाठी, प्रथम तुम्हाला एक ऍप Install करावे लागेल. ज्याचे नाव आहे ‘स्किप ऍडस ( skip ads )’, हे ऍप्स गुगल प्ले स्टोअरवर सहज मिळेल, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते इन्स्टॉल देखील करू शकता.  https://play.google.com/store/apps/details?id=com.agooday.skipads ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा, ते ओपन करताच तुमच्या समोर एक पेज येईल, त्यात ok वर क्लिक करा. ओके वर क्लिक करून, तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाल, तळाशी जा आणि जाहिराती वगळा चालू करा. आता तुमच्याकडून परवानगी मागितली जाईल, इथे ok वर क्लिक करून परत या, आणि आता या YouTube link वर क्लिक करून https://youtu.be/nGFzHdqRnU4  यूट्यूब उघडा, तुम्हाला दिसेल की जी जाहिरात तुम्हाला पुन्हा पुन्हा वगळायची होती ती आपोआप वगळली जाईल.

जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात

इमेज
 "जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात" जागतिक बँकेचे माझी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा. भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा भक्कम असला तरीही वाढत्या विभाजक आणि ध्रुवीकरण या मुळे विकासाचा पाया खराब होत आहे. भारतात सध्या सर्वात मोठे आव्हान बेरोजगारी आहे. बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांनी पोहचला आहे, तो जगात सर्वात जास्त आहे. असे जागतिक बँकेचे माझी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी सांगितले. कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नसून तो राष्ट्राच्या आर्थिक यशामध्ये जनतेचा विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारत देशात समाज विभाजन आणि ध्रुवीकरण वाढत आहे. हे फक्त खोदजनक नाही तर देशाच्या विकासाच्या पायालाह हानी पोहोचवत आहे, असे अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी म्हटले आहे. बसू यांच्या मते, मोठा उद्योजक वर्ग, अधिक कुशल कामगार एकूण देशांतर्गत उत्पादन (जिडीपी) गुणोत्तरामध्ये जास्त गुंतवणूक यामुळे आपल्या भारताचा पाया मजबूत आहे. मात्र गेल्याकाही काळापासून कुशल कामगारांची संख्या कमी होत आहे. याचे नुकसान देशाला बसू शकतो. भारतातील महागाईचे कारण जागतिक आहे. कोरोना महामारी आणि युक्रेन युद्धामुळे पुरवठा साख...

गरीब चिकुवाल्याचे यश

इमेज
  हि गोष्ट आहे एका गरीब चिकुवाल्याची जुन्नरच्या लहानश्या गावात नवरा बायको म्हणजे किरण आणि सिमा राहत असतात. तसा किरण एक साधारण माणूस होता, पण त्या कडे एक छोटीशी जमीन होती. त्यात त्याने आपल्यासाठी एक घर आणि घरच्या मागे बऱ्याच वर्षांपूर्वी चिकुची बाग लावली होती. किरण : बघ सिमा झाडं तर मोठी झाली आहेत. सिमा : हो, पण अजून झाडाला चिकू का आले नाहीत? किरण : इतके वर्ष झाडांची देखरेख केली आहे अजून काही महिने बघू, झाडांना भरपूर पाणी द्यावे लागेल आणि चिकू पण लवकर येतील. सिमा: आशा करते लवकर येतील. किरण आणि सीमा रोज त्या झाडांची जास्त काळजी घ्यायला लागले. रोज सकाळी सर्व झाडांना पाणी घातल्यावरच किरण आपल्या नोकरीवर जायचा. जवळील एका हॉटेल वर मॅनेजर म्हणून काम करत असे. आज तू रोजच्या सारखा उशीर आलास किरण (त्याचा मालक त्याला बोलला) किरण : माफ करा मालक पुन्हा असा उशिरा नाही येणार, खरेतर मी लावलेल्या चिकूच्या बागेतल्या एका झाडाला किड लागली होती, मी औषधांची फवारणी करत होतो. मालक म्हणाला, ठिक आहे पण तू इतके वर्ष झाडांची निगा राखली आहेस, आलेत का नाही काही पीक ? किरण म्हणाला, येणार मालक नक्की येणार. त्याच दि...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25